Lokmat Sakhi >Food > बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

Cooking Tips For Potatoes: चिरलेले बटाटे आपण पाण्यात भिजत घालतो... पण असं का करावं? बघा त्याबाबतीत विज्ञान काय सांगतं....(soaking potatoes in water)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 09:18 AM2023-10-04T09:18:59+5:302023-10-04T09:20:01+5:30

Cooking Tips For Potatoes: चिरलेले बटाटे आपण पाण्यात भिजत घालतो... पण असं का करावं? बघा त्याबाबतीत विज्ञान काय सांगतं....(soaking potatoes in water)

Why soaking potatoes in water is important before cooking? | बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

HighlightsUnited States Department of Agriculture यांनी केलेल्या अभ्यासानुसार कच्च्या बटाट्यांमध्ये ७९ टक्के पाणी तर १६ टक्के स्टार्च असतं.

बटाट्याची भाजी उकडूनही केली जाते आणि त्याचे काप करूनही केली जाते. भाजी जेव्हा उकडून करतो तेव्हा आपण बटाटे धुवून सरळ कुकरमध्ये लावून टाकतो.  पण काप करून जेव्हा भाजी करायची असते तेव्हा मात्र आपण बटाट्याच्या फोडी करून त्या पाण्यात भिजत घालतो. बटाट्याचे चिप्स, बटाट्याचा उपवासाला करतात तो किस किंवा बटाट्याची भजी करायची असतील, तेव्हाही बटाटा आपण पाण्यात भिजत घालतो. असं नेमकं का केलं जातं? (Why soaking potatoes in water is important before cooking?)


बऱ्याचदा स्वयंपाक करताना आपण त्यामागचं विज्ञान समजून घेत नाही. फक्त आपल्या आजी-आई करत आल्या म्हणून तेच आपणही सुरू ठेवतो.

गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग

बटाटे जर पाण्यात घातले नाहीत तर ते लालसर पडतात म्हणून ते पाण्यात भिजत घालायचे एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्या मागचं खरं कारण काय आहे हे आता पाहूया...

 

United States Department of Agriculture यांनी केलेल्या अभ्यासानुसार कच्च्या बटाट्यांमध्ये ७९ टक्के पाणी तर १६ टक्के स्टार्च असतं. एवढ्या जास्त प्रमाणात स्टार्च असतील तर तो पदार्थ पचायला कठीण जातो.

मुलीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून वडिलांनी दिली घाणेरड्या पाण्याची बाटली! असे कसे वडील, असे का केले त्यांनी.. वाचा..

शिवाय बटाट्याचा कोणताही पदार्थ करताना स्टार्चची रिॲक्शन अन्य पदार्थांसोबत होते आणि बटाटा अधिक चिकट होतो. असं होऊ नये आणि स्टार्चचं प्रमाण कमी होऊन बटाटा पचायला सोपा व्हावा, म्हणून बटाट्याचे काप आपण पाण्यात भिजत टाकतो. बटाट्याची भाजी, किस किंवा भजी करायची असतील तर बटाट्याचे काप १० ते १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावेत. कच्चे बटाटे तळून तुम्ही फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स करणार असाल तर मात्र ३० मिनिटे तरी बटाट्याचे काप पाण्यात भिजू द्यावेत. 
 

Web Title: Why soaking potatoes in water is important before cooking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.