Lokmat Sakhi >Food > घरी लावलेल्या दह्याला तार सुटून ते चिकट होतं? ३ टिप्स- लावा परफेक्ट दही झटपट

घरी लावलेल्या दह्याला तार सुटून ते चिकट होतं? ३ टिप्स- लावा परफेक्ट दही झटपट

Why Does Sometime Homemade Curd Become Sticky?: घरी लावलेल्या दह्याला तारा सुटत असतील तर त्यामागची ही काही कारणं असू शकतात..(3 tips for making perfect delicious curd)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 16:34 IST2025-02-04T18:48:58+5:302025-02-05T16:34:54+5:30

Why Does Sometime Homemade Curd Become Sticky?: घरी लावलेल्या दह्याला तारा सुटत असतील तर त्यामागची ही काही कारणं असू शकतात..(3 tips for making perfect delicious curd)

why sometime homemade curd become sticky? 3 tips for making perfect delicious curd | घरी लावलेल्या दह्याला तार सुटून ते चिकट होतं? ३ टिप्स- लावा परफेक्ट दही झटपट

घरी लावलेल्या दह्याला तार सुटून ते चिकट होतं? ३ टिप्स- लावा परफेक्ट दही झटपट

Highlightsदही लावताना काय काळजी घ्यावी आणि दह्याला तारा सुटू नयेत म्हणून काय करावं?

घरी लावलेलं दही खाणं आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं हे आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळेच बऱ्याच जणींचा कल घरीच दही लावण्यावर असतो. पण कधी कधी घरी लावलेलं दही पुर्णपणे खराब होतं. म्हणजेच ते चांगलं विरजलेलं तर दिसतं पण तरीही जेव्हा आपण ते चमच्याने वर उचलून पाहातो तेव्हा त्याला तारा सुटलेल्या दिसतात. असं तारा सुटलेलं दही अजिबातच खावंसं वाटत नाही. शिवाय ते दही लावण्यासाठी जे दूध वापरलं होतं ते सुद्धा वाया गेलं याचं वाईट वाटतं (3 tips for making perfect delicious curd). म्हणूनच दही लावताना काय काळजी घ्यावी आणि दह्याला तारा सुटू नयेत म्हणून काय करावं याविषयीची माहिती...(Why Does Sometime Homemade Curd Become Sticky?)

 

दह्याला तारा येऊन ते चिकट का होतं?

१. दह्याला तारा येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही विकत मिळणारं पॅकबंद दही आणून जर त्याचं दही लावलं तर बहुतांश वेळा त्याला तारा येतात.

सगळ्याच स्वयंपाकासाठी सरसकट एकच तेल वापरता? तुम्ही चुकताय.. पदार्थानुसार करा तेलाची निवड 

याचं कारण म्हणजे विकतचं दही तयार करण्यासाठी काही केमिकल्स वापरलेली असतात. आपण घरात ज्या पद्धतीने दही लावतो ती पद्धत आणि बाहेर पॅकबंद दही लावण्याची पद्धत पुर्णपणे वेगळी असते. त्यामुळे दही व्यवस्थित विरजत नाही आणि त्याला तारा सुटतात. त्यामुळे शक्यतो डेअरीमध्ये मिळणारं सुटं दही विरजण लावण्यासाठी वापरावं.

 

२. जर तुमच्या घरचं दूध खूप शिळं झालेलं असेल तर त्याचंही दही चांगलं होत नाही. त्या दह्याला तारा सुटून आंबट वास येतो. त्यामुळे खूप जास्त शिळं असलेलं दूध आणि विरजण दही लावण्यासाठी घेऊ नका. दूध आणि विरजण दोन्हीही फ्रेश असावं.

मुलांचे पांढरे गणवेश काही दिवसांतच पिवळट- काळपट दिसतात? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखे चमकतील

३. जर बाहेर खूप थंडी असेल तरीही दही आंबण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्याला तारा सुटतात. असं जर असेल तर दही आणखी थोडे तास विरजण्यासाठी ठेवा. काही तासांनी आपोआप ते घट्ट होईल आणि त्याच्या तारा कमी होतील. 
 

Web Title: why sometime homemade curd become sticky? 3 tips for making perfect delicious curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.