Lokmat Sakhi >Food > पालक-पनीर फक्त भाजीच कशाला? करा ३ चविष्ट-पौष्टिक पदार्थ, कॉम्बिनेशन सुपरहिट

पालक-पनीर फक्त भाजीच कशाला? करा ३ चविष्ट-पौष्टिक पदार्थ, कॉम्बिनेशन सुपरहिट

रोज वेगळं काय करायचं असा प्रश्न असेल तर घ्या हे पौष्टीक आणि हटके पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 01:45 PM2022-06-01T13:45:29+5:302022-06-01T14:16:00+5:30

रोज वेगळं काय करायचं असा प्रश्न असेल तर घ्या हे पौष्टीक आणि हटके पर्याय

Why spinach-paneer is just a vegetable? Make 3 tasty-nutritious foods, a combination superhit | पालक-पनीर फक्त भाजीच कशाला? करा ३ चविष्ट-पौष्टिक पदार्थ, कॉम्बिनेशन सुपरहिट

पालक-पनीर फक्त भाजीच कशाला? करा ३ चविष्ट-पौष्टिक पदार्थ, कॉम्बिनेशन सुपरहिट

Highlightsनाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला सारखे काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतो अशावेळी हे पर्याय नक्की ट्राय करु शकताया दोन्ही गोष्टींमध्ये अनेक पोषक तत्त्व असल्याने आरोग्यासाठीही ते चांगले ठरतात


रोज वेगळे आणि तरीही पौष्टीक काय करायचे असा प्रश्न महिलावर्गापुढे असतो. पोळीभाजीचा कंटाळा आला म्हणून वेगळं काहीतरी दे असा धोशा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी लावलेला असतो. अशावेळी वेगळं, पौष्टीक आणि तरीही जीभेचे चोचले पुरवणारे काय करता येईल ते आपल्याला सुचत नाही. मात्र पालक आणि पननीर या दोन गोष्टींपासून अतिशय चविष्ट आणि वेगळे पदार्थ तयार करता येतात. पालक पनीरमध्ये (Palak Paneer) भरपूर मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पालक पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने ते हृदय आणि स्नायूंच्या सुरळीत कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. 

(Image : Google)
(Image : Google)

पनीरमध्ये असलेले भरपूर प्रोटीन आणि B-12 अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात. या पदार्थांतील पौष्टिकतेमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. पालक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवते आणि तुमच्या हृदयातील रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता कमी होते. त्यात फोलेट देखील असते जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी उत्तम आहे. पालकातील मॅग्नेशियम घटक उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. पालक पनीर भाजीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट भरलेले वाटते आणि जास्त वेळ काहीही खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे तुम्ही अन्न जास्त खाणं टाळता आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. स्नायूंच्या बळकटीसाठीही पालक आणि पनीर अतिशय उपयुक्त असते. झटपट होणारे आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या गोष्टींपासून कोणते तीन पदार्थ करता येतील पाहूया.

पालक -पनीर राईस

पालक शिजवून त्याची मिक्सरमध्ये बारीक प्युरी करुन घ्यायची. भात मोकळा शिजवून घ्यायचा. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे, लवंग, काळी मीरी, तमालपत्र आणि थोडी दालचिनी घालायची. आलं, १ चमची मिरची लसूण पेस्ट घालून हे चांगले परतून घ्यायचे. यामध्ये पालक प्युरी घालून त्यात मीठ आणि धने-जीरे पावडर घालायची. चांगले शिजल्यावर यामध्ये शिजलेला भात घालून सगळे एकजीव करायचे. सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे घालून झाकण ठेवून एक वफ घ्यायची आणि गॅस बंद करायचा. दही रायता किंवा पापड यांसोबत हा भात अतिशय मस्त लागतो. गरमागरम दिल्यावर रात्रीचे जेवणही होऊ शकते आणि घरातील मंडळीही खूश.

(Image : Google)
(Image : Google)

पालक-पनीर कबाब

पालक आणला की त्याची ताकातली भाजी नाहीतर गोळा भाजी असे काहीतरी केले जाते. पण त्यापासून वेगळे काहीतरी करायचे असेल तर पालक-पनीर कबाब हा उत्तम पर्याय आहे. नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला सारखे काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतो अशावेळी हा पर्याय उत्तम ठरतो. पालक धुवून बारीक चिरुन घ्यायचा. पनीरही बारीक करुन घ्यायचे. यामध्ये तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, उकडलेला बटाटा, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धण-जीरे पावडर, थोडा चाट मसाला, हिंग-हळद, मीठ घालून याचे घट्टसर पीठ करायचे. या पीठाचे कटलेट थापून ते तव्यावर शॅलो फ्राय करायचे किंवा तेलात तळायचे. हे गरमागरम कटलेट सॉस किंवा चिंचेची चटणी यासोबत अतिशय छान लागतात. पालक आणि पनीर दोन्ही पौष्टीक पदार्थ पोटात गेल्याने आपल्यालाही घरातील सगळ्यांनी पौष्टीक काही खाल्ल्याचे समाधान मिळते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. पालक-पनीर भाजी

कांदा-टोमॅटो आणि आलं-मिरची-लसूण प्युरी करायची. पालक शिजवून त्याचीही प्युरी करुन घ्यायची. यासाठी पालक थोडा जास्त लागू शकतो. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये काळी मिरी, लवंग, तमालपत्र आणि जीरे घालून फोडणी करायची. त्यामध्ये हिंग, हळदही घालायचे. चांगले तडतडले की कांदा-टोमॅटो आणि आलं मिरची लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यायचे. यामध्ये मीठ घालायचे, चवीसाठी थोडी साखर घातली तरी चांगले लागते. पालक प्युरी घालून सगळे मिश्रण एकजीव करुन चांगले शिजवायचे. सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे घालून गॅस बंद करुन झाकण ठेवून वाफ काढायची. पनीर शक्यतो सगळ्यात शेवटी टाकल्याने ते रबरासारखे लागत नाहीत. अन्यथा पनीर शॅलो फ्राय करुन मग भाजीत घातले तरी चालतात. ही भाजी पुऱ्या, गरम पोळ्या, जीरा राईस अशा कशासोबतही अगदी छान लागते. 

Web Title: Why spinach-paneer is just a vegetable? Make 3 tasty-nutritious foods, a combination superhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.