Lokmat Sakhi >Food > कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून स्वयंपाकासाठी वापरा मोहरीचे तेल, ४ फायदे-आरोग्यासाठी उत्तम

कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून स्वयंपाकासाठी वापरा मोहरीचे तेल, ४ फायदे-आरोग्यासाठी उत्तम

Why You Should Replace Refined Oil With Cold Pressed Mustard oil for cooking : आरोग्य उत्तम ठेवायचं तर आहारात काही बदल आवर्जून करायला हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 03:09 PM2022-07-25T15:09:12+5:302022-07-25T15:47:10+5:30

Why You Should Replace Refined Oil With Cold Pressed Mustard oil for cooking : आरोग्य उत्तम ठेवायचं तर आहारात काही बदल आवर्जून करायला हवेत.

Why You Should Replace Refined Oil With Cold Pressed Mustard oil for cooking : Use Mustard Oil Instead of Refined Oil in Cooking to Avoid Increase in Cholesterol, 4 Benefits, Good for Health | कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून स्वयंपाकासाठी वापरा मोहरीचे तेल, ४ फायदे-आरोग्यासाठी उत्तम

कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून स्वयंपाकासाठी वापरा मोहरीचे तेल, ४ फायदे-आरोग्यासाठी उत्तम

Highlightsसतत रिफाईंड ऑईल वापरण्यापेक्षा मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरणे अधिक चांगले.  शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक घटक मोहरीच्या तेलात असतात, त्यामुळे आहारात या तेलाचा आवर्जून समावेश करायला हवा

तेल हा आपल्या स्वयंपाकातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पोळ्या, भाजी, आमटी किंवा स्वयंपाकातील बहुतांश पदार्थ हे तेलाशिवाय होत नाहीत. मात्र आपण कोणते तेल वापरतो तसेच ते किती प्रमाणात वापरतो यावर आपल्या आरोग्याच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. तेल हे आरोग्यासाठी आवश्यक असले तरी ते योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने वापरले तरच फायदेशीर ठरते. अन्यथा तेलामुळे लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा इतरही अनेक समस्या निर्माण होतात. भविष्यात आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी सुरुवातीपासूनच योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपण स्वयंपाकासाठी साधारणपणे रिफाईंड ऑइल वापरतो. पण रिफाईंड ऑइलपेक्षा मोहरीचे तेल आरोग्यासाठी अधिक चांगले असते. तसेच हे तेल कोल्ड प्रेस असले किंवा घाण्याचे असेल तर आणखी चांगले. पाहूयात मोहरीच्या तेलाचे आरोग्यासाठी असणारे फायदे (Why You Should Replace Refined Oil With Cold Pressed Mustard oil for Cooking)...

(Image : Google)
(Image : Google)

रोजच्या स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरण्याचे फायदे...

१. तेल हे साधारणपणे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे आपल्याला कोलेस्टेरॉल किंवा आरोग्याच्या इतर तक्रारी उद्भवतात. पण मोहरीच्या तेलात हेल्दी फॅटस असतात. हे फॅटस रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत नसल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवत नाहीत. 

२. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिडस असतात. हे दोन्ही घटक अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत असतात. शरीरातील पेशींची निर्मिती करण्यासाठी आणि त्यांचे कार्य दुरुस्त करण्यासाठी अँटीऑक्सिडंट उपयुक्त असल्याने मोहरीचे तेल स्वयंपाकात वापरणे फायदेशीर ठरते. 

३. मोहरीच्या तेलामुळे बॅड कोलेस्टेरॉलच्या पातळीत घट होण्यास मदत होते. हे तेल रक्तवाहिन्यांना चिकटत नाही तसेच बॅड कोलेस्टेरॉल अडवण्याचे कामही या तेलाने केले जाते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये या तेलाचे थर साठून राहत नाहीत आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. मोहरीच्या तेलामध्ये ग्लुकोसिनोलेट हा अँटी-मायक्रोबियल घटक असतो जो विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून आणि मुक्त रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करण्यास मदत करतो.

रिफाईंड ऑइल का वापरु नये...

रिफाईंड तेलावर विविध प्रकारच्या मशीनव्दारे प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये तेलामध्ये तयार होणारे ट्रान्स फॅट आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असतात. अशाप्रकारच्या रिफाईंड तेलाचे नियमितपणे सेवन केल्याने कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या गंभीर समस्यांबरोबरच पचनाशी निगडीत समस्या, लठ्ठपणा, प्रतिकारशक्ती कमी होणे अशा विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे सतत रिफाईंड ऑईल वापरण्यापेक्षा मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरणे अधिक चांगले.  

Web Title: Why You Should Replace Refined Oil With Cold Pressed Mustard oil for cooking : Use Mustard Oil Instead of Refined Oil in Cooking to Avoid Increase in Cholesterol, 4 Benefits, Good for Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.