Join us  

ताज्या आवळ्याचे चटपटीत लोणचं घरीच करा; पौष्टीक लोणच्याची रेसिपी, वर्षभर खराब होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 9:33 AM

Winter Special Amla Pickle Recipe (Aavla loncha Recipe) : चवीला तुरट असल्यामुळे अनेकांना कच्चा आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्याचे चवदार, चविष्ट पदार्थ बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता.

थंडीच्या (Winter Special) दिवसात बाजारात ताजे आवळे पाहायला मिळतात. (Amla Pickle Recipe) आवळे खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. (Amla Recipe) आवळ्याच्या सेवनानं सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो याशिवाय इम्यूनिटी चांगली राहण्यासही मदत होते. चवीला तुरट असल्यामुळे अनेकांना कच्चा आवळा खायला आवडत नाही. (How to Make Amla Pickle in Marathi) अशावेळी तुम्ही आवळ्याचे चवदार, चविष्ट पदार्थ बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता. आवळ्याचा मोरावळा, आवळ्याचे लोणचं असे पदार्थ  घरी तयार करणं खूप सोपं आहे. आवळ्याचं लोणचं करण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to make amla pickle)

आवळ्याच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य (Aavlyacha Loncha kasa karaycha)

१) आवळे - १० ते १२

२) व्हिनेगर- ३० ml

३) हळद - १ टिस्पून

४) लाल तिखट- १ टिस्पून

५) मोहोरी- १ टिस्पून

६) पिवळी मोहोरी- १ टिस्पून

७) धणे - २ टिस्पून

८) जीरं- १ टिस्पून

९) काळी मिरी- अर्धा टिस्पून

१०) मेथी- अर्धा टिस्पून

११) मीठ- चवीनुसार

१२) हिंग- अर्धा टिस्पून

१३) तेल - गरजेनुसार

आवळ्याचे लोणचं  कसं करायचं? (Aavlyacha loncha recipe dakhva)

1) आवळ्याचं लोणचं करण्यासाठी सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात व्हिनेगर, हळद घालून पाणी उकळवून घ्या. उकळेल्या पाण्यात स्टॅण्ड ठेवून त्यावर त्यावर गाळणी ठेवा आणि धुवून पुसून घेतलेले आवळे त्यात घाला. आवळे १० ते १५ मिनिटं वाफवून घ्या. 

बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

2) एका कढईत काळी मोहोरी, मोहोरीचे पिवळे दाणे भाजून घ्या. त्यात धणे, जीरं, काळी मिरी, मेथी घालूनही व्यवस्थित भाजून घ्या. खलबत्यात घालून हे सर्व  साहित्य घालून व्यवस्थित कुटून घ्या.  वाफवून घेतलेल्या आवळ्याचे आवळ्याचे लांबट बारीक काप करून घ्या. 

विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

3) आवळ्याचे काप एका ताटात काढून त्यात वाटून घेतलेला मसाला, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. हातात ग्लोव्हज घालून किंवा चमच्याच्या साहाय्याने आवळ्याचे काप तेल आणि मसाल्यात एकजीव करा. तयार आवळ्याचं लोणचं तुम्ही बरणीत भरू शकता. लोणचं भरताना बरणी ओली नसेल याची काळजी घ्या. नाहीतर लोणचं लवकर खराब होऊ शकतं.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सथंडीत त्वचेची काळजी