थंडीच्या (Winter Care Tips) दिवसांत शरीराला असे पदार्थ खाण्याची गरज असते जे शरीरात उष्णता टिकवून ठेवतील. शरीराला आतून गरम ठेवण्याही मदत करतील. मका, ज्वारी, बाजरी या धान्यांच्या भाकरी हिवाळ्याच्या दिवसांत भरपूर खाल्ल्या जातात. पण बाजरीची भाकरी बनवणं सर्वांनाच जमत असे नाही (Winter Special Bajra Roti Recipe). बाजरीची भाकरी थापताना तुटते, तर पीठ मळताना हाताला चिकटतं असं अनेकदा होतं. भाकरी परफेक्ट होण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Bajra Roti)
बाजरीची भाकरी खाल्ल्यानं शरीराला एनर्जी मिळते आणि उष्णताही टिकून राहते. बाजरीची भाकरी खायला खूपच चविष्ट असते. काहीजण गरमागरम भाकरीवर तूप लावून खातात. अनेकदा बाजरीची भाकरी करताना तुटते. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट बाजरीची भाकरी बनवू शकता. ज्यामुळे भाकरी सॉफ्ट राहील. (How To Make To Bajrichi Bhakri)
१) ताजं पीठ घ्या
चपातीच्या पीठाप्रमाणे बाजरीच्या भाकरीचं पीठ एकदाच जास्त मळून ठेवू नका. एका भाकरी पुरतं पीठ घेऊन ते मळा. मळल्यांनतर लगेच भाकरी बनवून घ्या. पीठ ताजं असेल याची काळजी घ्या कारण फार जुनं पीठ असेल तर भाकरी नीट थापली जाणार नाही.
२) पीठ मळणं
पीठ मळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची ते म्हणजे हातानं व्यवस्थित मळून घ्या पाणी जास्त किंवा कमी असू नये. हळूहळू पाणी घाला, ज्यामुळे भाकरी परफेक्ट बनते. तुम्ही या भाकरीत आवडीनुसार तीळसुद्धा घालू शकता.
३) कोमट पाण्याचा वापर
पीठ मळताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर केल्यास पीठ चिकट होईल व्यवस्थित मळलं जाणार नाही आणि मळताना जास्त मेहनत करावी लागेल.
४) भाकरी शेकणं
भाकरी नेहमी मध्यम आचेवर शेका. उच्च आचेवर भाकरी शेकल्यास रंग आणि चव दोन्ही बिघडू शकते. भाकरी शेकताना पीठ लागलेला भाग नेहमी वर ठेवा. त्यावर पाणी लावून ५ मिनिटं शेकल्यानंतर भाकरी पलटून घ्या.. नंतर खालच्या बाजूला डाग पडेपर्यंत भाकरी शेका. पुन्हा भाकरी पलटताना फुलक्यांप्रमाणे भाकरी थेट आचेवर १० ते १५ सेकंदात तुम्ही शेकू शकता.