Lokmat Sakhi >Food > गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी

गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी

Winter Special Soup Recipe: हे सूप चवदार तर आहेच, पण अतिशय पौष्टिकही आहे. कारण यातून गाजर, बीट, टोमॅटो या सगळ्यांचं पोषण मिळतं. बघा रेसिपी (restaurant style tomato soup at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 05:01 PM2022-11-21T17:01:44+5:302022-11-21T17:02:28+5:30

Winter Special Soup Recipe: हे सूप चवदार तर आहेच, पण अतिशय पौष्टिकही आहे. कारण यातून गाजर, बीट, टोमॅटो या सगळ्यांचं पोषण मिळतं. बघा रेसिपी (restaurant style tomato soup at home)

Winter special carrot- beet- tomato soup, Simple- easy and delicious soup recipe | गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी

गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी

Highlightsहुडहुडी भरवणाऱ्या थंडीत रात्री जेवणामध्ये पौष्टिक, गरमागरम आणि चवदार सूप प्यायला मिळालं, तर मग क्या बात है..

थंडीचा पारा दिवसेंदिवस अधिकाधिक खाली जाऊ लागला आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तर तापमान आता १० डिग्री सेल्सियस पेक्षाही कमी नोंदवलं जात आहे. अशा हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत रात्री जेवणामध्ये पौष्टिक, गरमागरम आणि चवदार सूप प्यायला मिळालं, तर मग क्या बात है.. जेवणाची मजा अधिक वाढणार यात वादच नाही.. म्हणूनच ही बघा एक सूप रेसिपी. गाजर, बीट आणि टोमॅटो यांचा वापर करून आपण हे सूप तयार करणार (How to make restaurant style tomato soup) आहोत. त्यामुळे चवीला तर ते उत्तम असणारच आहे शिवाय अतिशय पौष्टिकही.. करून बघा एकदा.(delicious soup recipe)

 

गाजर- बीट- टोमॅटो सूप रेसिपी
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या theclassyfoodophile या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
३ टोमॅटो
२ गाजर
अर्धे बीट
१ लहान आकाराचा कांदा

Wedding Special: पायावर काढण्यासाठी झटपट, सोप्या- आकर्षक मेहेंदी डिझाईन्स, बघा एक से एक सुंदर प्रकार
३ ते ४ लसूण पाकळ्या
एक ते दिड इंच आलं
२ तेजपान
६ ते ७ मिरे
२ ते ३ वेलची
अर्धा टीस्पून तेल
१ टीस्पून बटर
चवीनुसार मीठ आणि साखर

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी टोमॅटो, बीट आणि कांद्याचे मोठे काप करून घ्या.

२. गाजराची साले काढून त्याचेही काप करून घ्या.

३. एका कुकरमध्ये तूप आणि तेल टाका. त्यात तेजपान, वेलची, मीरे, आलं, लसूण टाकून परतून घ्या. 

बॉयफ्रेंड पहिल्यांदाच बघत होता 'कल हो ना हो', आणि पाहता पाहता....गर्लफ्रेंडने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल

४. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.

५. कांदा परतून झाला की टोमॅटो, बीट, गाजर टाकून परतून घ्या.

६. त्यानंतर कुकरचं झाकण लावून टाका आणि २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड होऊ द्या.

७. कुकरमधले सगळे पदार्थ मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी करून घ्या आणि नंतर गाळून घ्या.

८. त्यात थोडं पाणी टाका. गॅसवर उकळत ठेवा आणि त्यात चवीनुसार मीठ आणि साखर किंवा गूळ टाका. कॉर्नफ्लॉवर गरज वाटत असेल तरच टाकावे. उकळी आल्यावर चवदार, गरमागरम सूप तयार. 

 

 

Web Title: Winter special carrot- beet- tomato soup, Simple- easy and delicious soup recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.