थंडीचा पारा दिवसेंदिवस अधिकाधिक खाली जाऊ लागला आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तर तापमान आता १० डिग्री सेल्सियस पेक्षाही कमी नोंदवलं जात आहे. अशा हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत रात्री जेवणामध्ये पौष्टिक, गरमागरम आणि चवदार सूप प्यायला मिळालं, तर मग क्या बात है.. जेवणाची मजा अधिक वाढणार यात वादच नाही.. म्हणूनच ही बघा एक सूप रेसिपी. गाजर, बीट आणि टोमॅटो यांचा वापर करून आपण हे सूप तयार करणार (How to make restaurant style tomato soup) आहोत. त्यामुळे चवीला तर ते उत्तम असणारच आहे शिवाय अतिशय पौष्टिकही.. करून बघा एकदा.(delicious soup recipe)
गाजर- बीट- टोमॅटो सूप रेसिपीही रेसिपी इन्स्टाग्रामच्या theclassyfoodophile या पेजवर शेअर करण्यात आली आहे.साहित्य३ टोमॅटो२ गाजरअर्धे बीट१ लहान आकाराचा कांदा
Wedding Special: पायावर काढण्यासाठी झटपट, सोप्या- आकर्षक मेहेंदी डिझाईन्स, बघा एक से एक सुंदर प्रकार३ ते ४ लसूण पाकळ्याएक ते दिड इंच आलं२ तेजपान६ ते ७ मिरे२ ते ३ वेलचीअर्धा टीस्पून तेल१ टीस्पून बटरचवीनुसार मीठ आणि साखर
रेसिपी१. सगळ्यात आधी टोमॅटो, बीट आणि कांद्याचे मोठे काप करून घ्या.
२. गाजराची साले काढून त्याचेही काप करून घ्या.
३. एका कुकरमध्ये तूप आणि तेल टाका. त्यात तेजपान, वेलची, मीरे, आलं, लसूण टाकून परतून घ्या.
४. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.
५. कांदा परतून झाला की टोमॅटो, बीट, गाजर टाकून परतून घ्या.
६. त्यानंतर कुकरचं झाकण लावून टाका आणि २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड होऊ द्या.
७. कुकरमधले सगळे पदार्थ मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी करून घ्या आणि नंतर गाळून घ्या.
८. त्यात थोडं पाणी टाका. गॅसवर उकळत ठेवा आणि त्यात चवीनुसार मीठ आणि साखर किंवा गूळ टाका. कॉर्नफ्लॉवर गरज वाटत असेल तरच टाकावे. उकळी आल्यावर चवदार, गरमागरम सूप तयार.