Join us  

गाजराचा हलवा कधी खूप मोकळा होतो तर कधी एकदम लगदा, पाहा हलवा करण्याची झटपट सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2023 4:17 PM

Winter Special carrot Gajar Halva perfect easy Recipe : हलवा परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...

गाजराच्या सिझनमध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. बाजारात लालचुटूक मोठी मोठी गोड गाजरं यायला लागली की घरोघरी हा हलवा आवर्जून केला जातो. करायला सोपी, कमीत कमी खर्चात होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी पौष्टीक डीश असा हा गजराचा हलवा. तूप, खवा, साखर, सुकामेवा यांसारखे जिन्नस वापरुन केलेला हा हलवा काही जणांना इतका आवडतो की त्यावर अक्षरश: ताव मारला जातो. पोळीसोबत खाण्यासाठी, जेवणात स्वीट डीश म्हणून किंवा अगदी जेवणानंतरचे डेझर्ट म्हणूनही हा हलवा केला जातो. पण हा गाजराचा हलवा परफेक्ट जमला तर ठिक नाहीतर कधी तो फारच कोरडा फडफडीत होतो तर कधी एकदमच लगदा होतो. असं झालं की आपली इतकी मेहनत वाया जाते आणि पदार्थ आपल्याला हवा तसा झाला नाही म्हणून मूड जातो तो वेगळाच. म्हणूनच हलवा परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया (Winter Special carrot Gajar Halva perfect easy Recipe)...

 साहित्य - 

१. गाजर - १ किलो 

२. साजूक तूप - पाव वाटी 

३. दूध - १ ते २ वाट्या गरजेनुसार

(Image : Google)

४. साखर - २ ते ३ वाट्या आवडीनुसार 

५. खवा - पाव किलो 

६. वेलची पावडर - १/२ चमचा

७. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप - प्रत्येकी ८ ते १०

कृती - 

१. गाजर स्वच्छ धुवून कोरडे करुन मग किसून घ्यायचे. 

२. मग कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये गाजर छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. 

३. खमंग झाल्यासारखे वाटले की एका वाटीत खवा घेऊन त्यात दूध घालून तो हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करायचा आणि कढईत घालायचा.

४. साखर घालून सगळे चांगले एकजीव करायचे. 

(Image : Google)

५. खवा, साखर आणि गाजर चांगले एकजीव होईपर्यंत परतायचे आणि घट्टसर होईपर्यंत थोडी वाफ येऊ द्यायची.

६. सगळ्यात शेवटी वेलची पूड आणि सुकामेव्याचे काप घालायचे. 

७. हलवा खूप घट्टसर वाटला तर अंदाजे दूध घालायचे नाहीतर तूप, खवा आणि साखरेचा ओलावा गाजर शिजण्यास पुरेसा असतो.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.