Join us  

साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:17 AM

Winter Special Dry Fruits Ladoo (Dryfruits Che Ladoo Recipe dakhva) : ड्रायफ्रुट्स प्रत्येकाच्याच घरात असतात. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीर सुदृढ होते आणि पोटही भरतं.

हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता तयार होण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन करण्याची आवश्यकता असते. (Winter Care Tips) कारण वातावरणात झालेल्या बदलांमुळे शरीरात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते याचा परिणाम आजारांच्या माध्यमातून दिसून येतो. सर्दी, खोकला, घसादुखी उद्भवते तर कोणाला सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवतो. (Winter Special Dry Fruits Ladoo) हे त्रास टाळण्यासाठी आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे पळण्यापेक्षा आधीच आहारात थोड्याफार प्रमाणात बदल केला तर शरीर निरोगी राहील आणि कोणतेही त्रास उद्भवणार नाहीत. (Dry fruits ladoo kase karayche)

ड्रायफ्रुट्स प्रत्येकाच्याच घरात असतात. ड्रायफ्रुट्स  खाल्ल्याने शरीर सुदृढ होते आणि पोटही भरतं. ड्रायफ्रुट्सचे लाडू खाल्ल्याने तुम्हाला थकवा, अशक्तपणाही जाणवणार नाही. हे लाडू करायलाही अवघड नसतात ड्रायफ्रुट्सचे लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Ladoo Recipe)

ड्रायफ्रुट्स लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य (Dry Fruits Ladoo Making Steps)

१) बदामाचे काप- १ वाटी

२) काजू-पिस्त्याचे काप- १ वाटी

३) सुर्यफुलाच्या बीया - १ वाटी

४) भोपळ्याच्या बीया- १ वाटी

५) तीळ- १ वाटी

६) फ्लेक्सिड्स- अर्धी वाटी

७)  कलिंगडाच्या बीया- अर्धी वाटी

८) पिस्ता - १वाटी

९) खजूर- १ वाटी

१०) शेंगदाणे- १ वाटी

बिना साखरेचे- बिना गुळाचे ड्रायफ्रुट्स लाडू कसे करावेत (Dry fruits Ladoo Recipe)

१) ड्रायफ्रुट्सचे  लाडू  करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत साजूक तूप घालून घ्या. 

२) तूप गरम झाल्यानंतर त्यात बदामाचे काप तळून घ्या,  नंतर त्यात काजूचे काप, पिस्त्याचे काप, अक्रोड  घालूनही व्यवस्थित भाजून घ्या. तुम्ही यात आवडीनुसार शेंगदाणेही घालू शकता. 

ताकाची कढी करण्याची सोपी-परफेक्ट रेसिपी; अजिबात फुटणार नाही-कमी साहित्यात बनेल कढी

३) नंतर त्यात भोपळ्याच्या बीया, तीळ, आळशीच्या बीया, कलिंगडाच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया घालून त्या तळून घ्या. एका मिक्सर जारमध्ये खजूराचे तुकडे घालून खजूर बारीक करून घ्या.  

४) कढईत तूप घालून त्यात बारीक केलेले खजूराचे मिश्रण घाला.  खजूरात व्यवस्थित गरम करून घेतला की त्यात  ड्रायफ्रुट्स आणि बियाचे मिश्रण घाला.

बिना साखरेचे पौष्टीक डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी; मिश्रण कोरडे न होता करा परफेक्ट लाडू

5)  हे मिश्रण एकजीव करून घ्या नंतर गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर थोडं गरम असतानाच या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. तयार आहेत ड्रायफ्रुट्सचे लाडू

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स