चहा म्हणजे जीव की प्राण आहे.... असे अनेक तुम्हाला आजूबाजूला दिसतील. थंडी असो किंवा गरमी चहाचा घोट घेतल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. (Tea making Recipe) चहाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आतापर्यंत ट्राय केले असतील. त्यात कुल्हड चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, गुळाचा चहा असे अनेक प्रकार आहेत. दम चहा बनवण्याची सोपी रेसेपी या लेखात पाहूया... (How to make Dam Chai)
साहित्य
3 कप पाणी
3 कप दूध
3-4 चमचे चहाची पाने
3 चमचे साखर
3 लहान वेलची
कृती
दम चहा मंद आचेवर शिजवली जाते त्यामुळे चहा व्हायला लागतो. पण चवीला अप्रतिम लागते. यासाठी सर्व प्रथम 2 जाड तळाच्या भांड्यांमध्ये एकामध्ये 3 कप दूध आणि दुसर्यामध्ये 3 कप पाणी घ्या. 3 चमचे चहाची पाने आणि 3 छोटी वेलची पाण्यात टाकून 30 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.तसेच दूध मंद आचेवर शिजवून घ्या आणि दूध ढवळत राहा जेणेकरून दुधात क्रीम राहणार नाही.
चहाची पानं घालून पाणी उकळवून घ्या. यामुळे चहाचा सुगंध त्यात स्थिर होईल आणि चहाची चव कायम राहील. 30 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की दोन्ही अर्धे शिजलेले आहेत. आता दम चाय तयार आहे. २ कप चहा गाळून घ्या आणि गाळून झाल्यावर त्यात तापवलेलं दूध टाका. तयार आहे दम चहा. तुम्ही बिस्किटांसह हा चहा ट्राय करू शकता.