खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. मुगाची डाळ- तांदळाची खिचडी तर आपण नेहमी करतोच. पण हिवाळा (bajari khichadi specially for winter) सुरू होताच अनेक खवय्यांना वेध लागतात ते बाजरीच्या खिचडीचे. ही खिचडी उष्ण असल्याने ती फक्त हिवाळ्यातच खाल्ली जाते. हिवाळ्यात बाजरी चांगली पचते, शिवाय या दिवसांत बाजरी खाणं, आरोग्याच्या दृष्टीने अधिक पौष्टिकही असतं. म्हणूनच हिवाळ्यात हा एक खमंग पारंपरिक पदार्थ एकदा तरी व्हायलाच हवा. म्हणूनच ही घ्या बाजरीच्या खिचडीची सोपी रेसिपी (Bajari Khichadi Recipe).
कशी करायची बाजरीची खिचडी?
साहित्य
दिड वाटी बाजरी
१ वाटी मुगाची डाळ
चिमुकलीची बघा करामत! मांजरीला शिकवलं ट्रेडमिलवर धावायला, ट्रेडमिलवरचा 'कॅट'वॉक.. व्हायरल व्हिडिओ
४ ते ५ हिरव्या मिरच्या
१० ते १२ लसूण पाकळ्या
२ ते ३ लाल मिरच्या
२ टेबलस्पून शेंगदाणे
२ टेबलस्पून खोबऱ्याचे काप
चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल
कृती
१. सगळ्यात आधी बाजरी पाण्याने धुवून घ्या. ही ओलसर झालेली बाजरी एका कापडावर टाकून एखादा तास सुकू द्या.
२. त्यानंतर अर्धवट ओलसर असणारी बाजरी मिक्सरमधून जाडीभरडी वाटून घ्या. खूप बारीक करू नका.
३. आता गॅसवर कुकर तापायला ठेवा. कुकर तापलं की त्यात मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, हिंग टाकून फोडणी करून घ्या.
५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..
४. फोडणी झाल्यावर खोबरे आणि शेंगदाणे छान तळून घ्या. थोडीशी हळद टाका. त्यानंतर त्यात मिक्सरमधून भरडलेली बाजरी आणि मुगाची डाळ टाका.
५. डाळ आणि बाजरी परतून घेतली की त्यात या दोन्हीच्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे साधारण ६ वाट्या पाणी घाला.
६. पाण्याला उकळी आली की कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्या होऊ द्या.
७. त्यानंतर गॅस बंद करा. तांदळाची खिचडी असेल तर आपण त्यावर तूप घेतो. पण बाजरीच्या खिचडीवर तुपाऐवजी तेलाची खमंग फोडणी घातली जाते.
८. त्यामुळे खिचडीच्या वरून घेण्यासाठी पुन्हा एकदा लाल मिरच्या, लसूण, हिंग, मोहरी, जिरे टाकून खमंग फोडणी करून घ्या.