थंडीत भाकरीसोबत किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावणीसाठी ठेचा खाणारे बरेचजण असतात. ठेचा बनवणं सोपं असलं तरी परफेक्ट चव येण्यासाठी ठेचा बनवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असाव्या लागतात. (Winter Special Green Chilli Thecha Recipe) ठेचा चवीला उत्तम, बनवायला सोपा असतो. कमीत कमी वेळातवेळा अस्सल गावरान पद्धतीचा ठेचा तयार करण्याचा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो केल्यास ठेचा झटपट तयार होईल. (How to make mirchicha thecha)
महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. अगदी मोजक्या साहित्यात ठेचा तयार होतो. ठेचा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. काहीजण यात बेसन पीठ घालतात तर काहीजण साखरही घालतात.
कृती:
- सगळ्यात आधी तेल गरम करा आणि त्यात मूठभर हिरव्या मिरच्या घाला (देठ काढून टाका) आणि मध्यम आचेवर परतवा
- नंतर 1/4 कप लसूण पाकळ्या घाला
- जीरं (1 टीस्पून) आणि मीठ (1 टीस्पून) चांगले मिसळा. मंद ते मध्यम आचेवर 1-2 मिनिटे सर्वकाही शिजू द्या
- नंतर चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
- थंड होण्यासाठी बाजूला ठेवा
- कोरड्या भाजलेल्या शेंगदाण्यांसोबत ब्लेंडरमध्ये घाला. ही पेस्ट जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या. तयार आहे मिरचीचा ठेचा. ठेचा कमी तिखट करण्यासाठी मी जाड हिरव्या मिरच्या वापरू शकता. चपाती, भाकरी किंवा भातासह तोंडी लावणीला हा ठेचा खाऊ शकता.