Lokmat Sakhi >Food > थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी

थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी

Winter Special Guava Chutney Recipe (Peru chi chatni) : जेवणाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची चटणी ट्राय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:22 AM2023-11-22T10:22:40+5:302023-11-22T10:35:10+5:30

Winter Special Guava Chutney Recipe (Peru chi chatni) : जेवणाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची चटणी ट्राय करू शकता.

Winter Special Guava Chutney Recipe : How to make Guava Chutney Guava Chutney Making Process | थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी

थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसांत  (Winter Special Recipes) बाजारात ताजे पेरू दिसायला सुरूवात होते. ५ ते १० रूपयांत तुम्ही चवदार, छान पिकलेले पेरू विकत घेऊ शकता. तिखट मीठ लावून पेरू खाणं सर्वांनाच आवडते. (How to make Peruchi Chatani)  तर काहीजण गोड पेरू खाणं पसंत करतात. जेवणाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची चटणी ट्राय करू शकता. (Guava Chutney Recipe)

पेरूची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. बेसिक साहित्यापासून तुम्ही चटपटीत पेरूची चटणी बनवू शकता. पेरूची चटणी खायला चटपटीत,  स्वादीष्ट असल्यामुळे ही चटणी खाल्ल्याने तुमच्या तोंडाला चव येईल आणि दोन घास जास्त जेवण जाईल. (Cooking Hacks)

पेरूच्या चटणीसाठी लागणारं साहित्य (Guava Chutney Making Process)

१) पेरू- २ ते ३

२) मिरच्या- २ ते ३

३) कोथिंबीर- १ वाटी

४) आलं- १ इंच

५) धणे पावडर- १ टिस्पून

६) जीरं पावडर- १ टिस्पून

७) काळीमिरी पूड - १ टिस्पून

८) काळं मीठ- १ टिस्पून

९) साधं मीठ- चवीनुसार

१०) लिंबाचा रस- ३ ते ४ टिस्पून

११) पाणी- गरजेनुसार

पेरूची चटणी कशी करायची (Guava Chutney Recipe in Marathi)

१)सगळ्यात पेरू स्वच्छ धुवून पुसून घ्या. पेरूचे वरचे आणि खालचे टोक पूर्णपणे काढून घ्या. तुम्ही पेरूचे साल सुद्धा काढून टाकू शकता पण यात फायबर्स असतात  आणि सालाांमुळे चवसुद्धा चांगली येते.  

२) पेरूचे ४ भाग करून मधला बियांचा भाग  सुरीच्या साहाय्याने वेगळा करून घ्या. मधला भाग काढून टाकल्यानंतर पेरू लहान लहान भागात कापून घ्या. 

३) मिक्सरच्या भांड्यात पेरूचे काप, कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे करून घ्या. नंतर आल्याचे तुकडे करून घाला. मग १ लिंबाचा रस घाला. 

४) १ छोटा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जीरं पावडर घाला. त्यातच अर्धा चमचा काळीमिरी पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग

५) पेरूचे  मिश्रण बारीक केल्यानंतर तुम्ही त्यात गरजेनुसार पाणी घालू शकता. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता.

Web Title: Winter Special Guava Chutney Recipe : How to make Guava Chutney Guava Chutney Making Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.