थंडीच्या (Winter) दिवसात शरीराला उष्णता प्रदान करतील अशा पौष्टीक पदार्थांचे सेवन केले जाते. त्यात मेथीचे लाडू, अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू यांचा समावेश असतो. (Jowar Khichdi Benefits) तर रोजच्या जेवणात भाताच्या खिचडीऐवजी दलिया किंवा बाजरीच्या खिचडीचा समावेश केला जातो. (Winter Special Food)
या पदार्थांप्रमाणेच ज्वारीची खिचडी ही तितकीच पौष्टीक ठरते. ज्वारीची खिचडी खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ज्वारीची खिचडी करणं अगदी सोपं आहे ज्वारीची खिचडी करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. अगदी कमीत कमी साहित्यात ही खिचडी तयार होईल. (Jowar Khichdi Recipe)
ज्वारीची खिचडी कशी करायची? (How to Make Jawar Khichdi)
१) ज्वारीची पौष्टीक खिचडी करण्यासाठी ज्वारी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
२) सकाळी ज्वारी कुकरला लावून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. ३ ते ४ शिट्ट्या घेतल्यानंतर ज्वारी मऊ शिजलेली असेल नंतर गॅस बंद करा. तुम्ही यात मुगाची डाळही घालू शकता.
३) दुसरीकडे एका कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घ्या. कढईत तेल घालून जीरं, राई आणि मिरची, लसूण घालून फोडणी तयार करून घ्या.
४) त्यात शिजवलेली ज्वारी घाला. त्यात लाल तिखट, मीठ घाला. त्यात लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर घालून १० मिनिटं शिजवून घ्या. तयार आहे गरमागरम ज्वारीची खिचडी.
ज्वारीची खिचडी खाण्याचे फायदे
ज्वारी एक ग्लुटेन फ्री धान्य आहे. ज्यांना ग्लुटेनयुक्त पदार्थ आवडत नाहीत त्यांनी ज्वारीचे सेवन करायला हवे. खिचडी पचायला हलकी असते. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कमी कॅलरीजयुक्त आणि पोट भरलेलं राहील. ज्यामुळे वजन कमी होणं सोपं होईल. ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही.
दुधावर भरपूर दाट साय येण्यासाठी दूध तापवताना लक्षात ठेवा १ ट्रिक्स वापरा; भाकरीसारखी जाड येईल साय
उच्च फायबर्सयुक्त असल्यामुळे पचन तंत्र व्यवस्थित राहते. ज्वारीचे सेवन केल्याने एनर्जी मिळते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ज्वारीचे सेवन करू शकता. ज्यामुळे बराचवेळ भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.