Lokmat Sakhi >Food > थंडीच्या दिवसांत करा गरमागरम मटार उसळ-ब्रेडचा बेत, हिरव्यागार मटारची चविष्ट रेसिपी...

थंडीच्या दिवसांत करा गरमागरम मटार उसळ-ब्रेडचा बेत, हिरव्यागार मटारची चविष्ट रेसिपी...

Winter Special Matar Usal Green peas Recipe : ताज्या मटारची खास हिवाळ्यात नक्की ट्राय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 09:40 AM2023-12-04T09:40:20+5:302023-12-04T09:45:01+5:30

Winter Special Matar Usal Green peas Recipe : ताज्या मटारची खास हिवाळ्यात नक्की ट्राय करा

Winter Special Matar Usal Green peas Recipe : On cold days, make hot Matar Usal-bread recipe, a tasty green peas recipe... | थंडीच्या दिवसांत करा गरमागरम मटार उसळ-ब्रेडचा बेत, हिरव्यागार मटारची चविष्ट रेसिपी...

थंडीच्या दिवसांत करा गरमागरम मटार उसळ-ब्रेडचा बेत, हिरव्यागार मटारची चविष्ट रेसिपी...

थंडीच्या दिवसांत आपली भूक वाढलेली असते.  त्यामुळे एरवीपेक्षा थोडं जास्त खाल्ले जाते, थंडीमुळे या काळात खाल्लेले अन्न चांगले पचतेही. थंडीत बाजारात आवळे, गाजर, सिताफळ, मटार, पालेभाज्या, फळं असं सगळंच मोठ्या प्रमाणात येतं. यामध्ये आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा हिरवागार मटार. एरवी आपल्याला मटार वापरायचा असेल तर फ्रोजन मटार किंवा वाटाणे वापरावे लागतात. पण थंडीच्या काळात ताजा मटार मिळत असल्याने घरोघरी मटारचे एकाहून एक चविष्ट पदार्थ केले जातात. यामध्ये मटार भात, मटार कटलेट, मटार करंजी, मटार उसळ असे बरेच पदार्थ केले जातात. थंडीत भूक वाढते त्याचप्रमाणे गारठा असल्याने गरमागरम खाण्याची इच्छा  होते. मटार गोड असेल आणि त्याची ग्रेव्ही परफेक्ट जमली तर या उसळीवर ताव मारला जातो. गरमागरम मटार उसळ आणि पुऱ्या किंवा ब्रेड हा बेत थंडीत केला जाणारा स्पेशल बेत तुम्हालाही करायचा असेल तर मटार उसळची सोपी आणि परफेक्ट रेसिपी पाहूया (Winter Special Matar Usal Green peas Recipe)...

साहित्य -

१. मटार - ३ ते ४ वाट्या

२. खोबरं - अर्धी वाटी 

३. आलं - १ ते २ इंच 

४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या 

५. मिरच्या - २ ते ३ 

६. कांदा - १ 

७. काजू - ६ ते ८

८. पुदिना - १ वाटी 

(Image : Google)
(Image : Google)

९. कोथिंबीर - १ वाटी 

१०. मीठ - चवीनुसार 

११. साखर - चवीनुसार 

१२. धणे- जीरे पावडर - अर्धा चमचा 

१३. तेल - २ चमचे 

१४. फोडणीचे सामान

कृती -

१. मटार सोलून स्वच्छ धुवून घ्यावेत.

२. कांदा चिरुन आणि खोबऱ्याचे बारीक काप करुन घ्यावेत. 

३. आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीन, खोबरं, काजू, कांदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यावी.

४. कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद घालून त्यामध्ये ही पेस्ट टाकून चांगली परतून घ्यावी.

५. त्यात मटार घालून अंदाजे पाणी घालावे. 

६. सगळे चांगले एकजीव करुन त्यामध्ये धणे-जीरे पावडर, मीठ आणि साखर घालावी.

७. एक उकळी आली की गॅस बारीक करुन झाकण ठवून चांगले शिजू द्यावे.

८. काजू, कांदा, खोबरं यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीमुळे छान हिरवा रंग येतो. 

९. ही उसळ ब्रेड किंवा पुऱ्या, गरम फुलके, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते.

 

Web Title: Winter Special Matar Usal Green peas Recipe : On cold days, make hot Matar Usal-bread recipe, a tasty green peas recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.