Lokmat Sakhi >Food > विंटर स्पेशल मशरूम-ब्रोकोली सूप, राहाल एनर्जेटिक, बनवायला सोपी झटपट

विंटर स्पेशल मशरूम-ब्रोकोली सूप, राहाल एनर्जेटिक, बनवायला सोपी झटपट

Mushroom-Broccoli Soup Winter Special मशरूम-ब्रोकोली सूप बनवणे फार कठीण नाही. जर आपण ही रेसिपी ट्राय केली नसेल तर आजच ट्राय करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 08:05 PM2022-11-16T20:05:58+5:302022-11-16T20:07:20+5:30

Mushroom-Broccoli Soup Winter Special मशरूम-ब्रोकोली सूप बनवणे फार कठीण नाही. जर आपण ही रेसिपी ट्राय केली नसेल तर आजच ट्राय करा...

Winter Special Mushroom-Broccoli Soup, Stay Energetic, Quick and Easy to Make | विंटर स्पेशल मशरूम-ब्रोकोली सूप, राहाल एनर्जेटिक, बनवायला सोपी झटपट

विंटर स्पेशल मशरूम-ब्रोकोली सूप, राहाल एनर्जेटिक, बनवायला सोपी झटपट

हिवाळा हा थंडीचा ऋतू सगळ्यांना आवडतो. या दिवसात गरम पदार्थ खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. हिवाळ्यात बहुतेक लोकं सूप जास्त पितात. शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी व आजारांपासून लांब राहण्यासाठी आहारात सूपचे सेवन अधिक केले जाते. सूप विविध प्रकारचे बनवले जातात. आपण आजपर्यंत मशरूम आणि ब्रोकोलीची फक्त भाजी खाल्ली असेल. या दोन्ही भाज्या पौष्टिक तत्वांनी भरपूर आहेत. सूपमधून देखील हे भाज्या खूप चविष्ट लागतात. त्यातील गुणधर्म सूपमध्ये उतरते. आणि शरीराला नवीन उर्जा देतात. जर आपण आपल्या आरोग्याची योग्यरित्या काळजी घेत असाल तर, आजच आहारात सूपचा समावेश करा. या दिवसात आपण मशरूम आणि ब्रोकोलीपासून पौष्टिक सूप बनवू शकता. मशरूम ब्रोकोली सूप बनवणे फार कठीण नाही. जर आपण ही रेसिपी ट्राय केली नसेल तर आजच ट्राय करा, बनवायला सोपी आणि हेल्थी ही रेसिपी झटपट बनते.

मशरूम - ब्रोकोली सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य

ब्रोकोली - १

मशरूम - १ कप 

जिरे - १ टेबलस्पून 

काळी मिरी पावडर - 1 टेबलस्पून 

मलई - 2 टेबलस्पून 

धणे - 2 चमचे

तेल - १ टेबलस्पून 

मीठ - चवीनुसार

पाणी 

कृती

 

सर्वप्रथम मशरूम आणि ब्रोकोलीला चांगले धुवून घ्या, त्यानंतर बारीक चिरून घ्या. आता प्रेशर कुकरमध्ये १ चमचा तेल टाका. काही सेकंदानंतर बारीक वाटून घेतलेले जिरे आणि काळी मिरी पावडर तेलात भाजून घ्या. मसाले भाजून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली ब्रोकोली आणि मशरूम टाका. हे दोन्ही भाज्या मसाल्यांसहित भाजून घ्या. भाज्या चांगल्या भाजून घेतल्यानंतर झाकण ठेवून २ मिनटे शिजवून घ्या. भाज्या शिजल्यानंतर त्यात २ कप पाणी टाका, चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या येऊपर्यंत सूप शिजवून घ्या.

कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर सूप थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे. त्यानंतर ब्लेंडरच्या सहाय्याने संपूर्ण मिश्रण एकजीव करावे. अशा प्रकारे आपले सूप रेडी झाले.  एका बाउलमध्ये तयार सूप बाजूला काढून घेणे. त्यात क्रीम आणि कोथिंबीर टाकावी. अशा प्रकारे आपले सूप पिण्यासाठी तयार.

Web Title: Winter Special Mushroom-Broccoli Soup, Stay Energetic, Quick and Easy to Make

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.