Join us  

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 10:26 PM

Kitchen Tips : How To Store Paneer The Right Way : महागडे पनीर लवकर शिळे-कडक झाले तर काय अशी भीती वाटते, हा उपाय करुन पाहा...

'पनीर' हा दुधापासून तयार केला जाणारा शाकाहारी पदार्थ आहे. जवळपास आपल्या सर्वांनाच पनीर प्रचंड आवडते. मग ती पनीरची भाजी असो किंवा पनीर पराठा... शाकाहारी लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग असलेले पनीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पनीर हे फक्त चवदारच नसून ते आपल्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर असते. नासलेल्या दुधापासून बनविण्यात येणारा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. पनीरचे अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये भाजीचे प्रकार अधिक असतात. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारे पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच जास्त छान लागते. अगदी स्टार्टरपासून ते भाजीपर्यंत अनेक पदार्थ पनीरपासून बनवता येतात((How To Store and Cut Paneer)

प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेले हे पनीर आहारात असायला हवे म्हणून आपण अनेकदा आणतो. कधी पनीरचा गरमागरम पराठा, पनीरची भाजी किंवा पनीर पुलाव नाहीतर आणखी काही करण्यासाठी आपण आवर्जून पनीर वापरतो. असे असले तरीही आपण एकावेळी आणलेले पनीर लगेच संपतेच असे नाही. अशावेळी हे राहीलेले पनीर फ्रिजमध्ये कसे स्टोअर करुन ठेवायचे असा आपल्याला प्रश्न पडतो. हे पनीर थोडे जरी उघडे राहीले तर ते कडक होते आणि वापरणे अवघड होऊन जाते. इतकेच नाही तर ते डब्यात ठेवले तरी त्यातले मॉईश्चर कमी होऊन जाते. अशावेळी पनीर साठवण्याची नेमकी कोणती योग्य पद्धत आहे हे पाहूयात. या सोप्या ट्रिकमुळे पनीर आठवडाभर नीट टिकून राहते(With The Help Of These Tips You Can Keep Paneer Fresh For a Long Time).

पनीर नेमके कसे स्टोअर करावे ? 

एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये पनीरचा क्यूब ठेवायचा. अशाप्रकारे पनीर पाण्यात ठेवले की ते १ ते २ दिवस नाही तर तब्बल आठवडाभर चांगले राहते. पनीरमधील मॉईश्चर टिकून राहण्यासाठी हा अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला पनीर काही दिवसांनी वापरायचे असेल तरी आपण ते एकदम फ्रेश असल्यासारखे वापरु शकतो.

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

पनीर पाण्यांत भिजवून ते स्टोअर करताना ते हवाबंद डब्यांत स्टोअर करणे टाळावे. पनीर पाण्यांत भिजवून ठेवल्यावर त्यावर हलकेच झाकण ठेवावे किंवा एखाद्या सुती कापडाने झाकून घ्यावे परंतु गच्च झाकण लावणे टाळावे. याचबरोबर जर आपल्याला हे पनीर २ ते ३ आठवड्यापर्यंत फ्रेश ठेवायचे असल्यास दर २ ते ३ दिवसांनी त्यातील पाणी बदलत राहावे. यामुळे पनीर दीर्घकाळ फ्रेश राहते. पनीर पाण्यांत भिजवून ठेवताना पनीरच्या तुकड्यापेक्षा अधिक पाणी त्यात असावे म्हणजेच पनीर संपूर्णपणे पाण्यांत भिजेल असे ठेवावे. 

उकडलेले गरम बटाटे सोलण्याची १ सोपी ट्रिक, हात न पोळता साल काढा झटपट...

सँडविच, तेही ब्रेडशिवाय ? शेफ कुणाल कपूर सांगतोय खास सिक्रेट रेसिपी, सँडविच होईल सॉफ्ट व पौष्टिक...

पनीर कापताना त्याचा भुगा होऊ नये म्हणून ते कसे कापायचे ?  

पनीर कापताना त्याचा काहीवेळा भुगा होतो. त्यामुळे आपल्याला हवे तसे तुकडे करता येत नाहीत. आपण पनीर सुरीने कापत असल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यासाठीच पनीर सुरीने न कापता दोऱ्याने कापले पाहिजे. यामुळे पनीर एकसारखे कापले जाण्यास मदत होते व एकाचवेळी पनीरचे सारख्या आकाराचे तुकडे होतात.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स