मसाल्याच्या डब्यात हळद (Haldi) हमखास असते. जिरं, मोहरीप्रमाणे हळदही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हळद हा भारतातील एक पारंपारिक मसाला आहे (Kitchen Tips). ज्यामध्ये कर्क्युमिन नावाचे शक्तिशाली संयुग असते (Cooking Tips). यातील गुणधर्मामुळे हृदयविकार आणि सांधेदुखी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात.
आपण बहुतांश पदार्थांमध्ये हळद घालतो. हळद घालताच, पदार्थाची चव वाढते. पण प्रत्येक पदार्थात हळद घालणं योग्य नाही. काही भाज्यांमध्ये हळद घातल्याने त्यातील गुणधर्म बिघडते. यासह चव वाढण्याऐवजी बिघडते. पण कोणत्या भाज्यांमध्ये हळद घालू नये? पाहूयात(With what should turmeric not be consumed?).
कोणत्या भाजीमध्ये हळद घालणं टाळावे?
मेथी
हिवाळ्यात मेथीची जुडी स्वस्तात मस्त मिळते. मेथी खाण्याचे अनेक फायदे आहे. मेथीची भाजी, मेथीचे पराठे, मेथीची वडी आपण करतोच. पण मेथीचे पदार्थ करताना, तय्त हळद न घालण्याचा सल्ला मिळतो. मेथीच्या भाजीमध्ये हळद घातल्याने त्याचा रंगही बिघडतो आणि चवही. त्यामुळे शक्यतो हळद घालणं टाळा.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
वांगी
वांगीची भाजी अथवा वांगीपासून तयार पदार्थांमध्ये शक्यतो हळद घालू नये. यामुळे वांगीची भाजी करताना त्याची चव कडू लागू शकते.
काळी मिरी
मीठ आणि काळी मिरी घालून बनवलेल्या भाज्यांमध्ये हळद घालू नये. अन्यथा त्याची चव खराब होऊ शकते.
- याव्यतिरिक्त आपण कोणत्याही भाजी, दूध किंवा कोमट पाण्यातही हळद घालून पिऊ शकता.
- जर घाईमध्ये हळद जास्त प्रमाणात पडली असेल तर, आपण त्यात टोमॅटोची प्युरी किंवा लिंबाचा रस घालू शकता. हळदीचा तिखट, उग्र स्वाद आणि सुगंध कमी करण्यासाठी त्यात टोमॅटोची प्युरी किंवा लिंबाचा रस घालू शकता.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
- किंवा आपण बटाटेही घालू शकता. पदार्थात कच्चे बटाटे घातल्याने मीठ आणि हळद बॅलेन्स करण्यास मदत होते. एका कच्च्या बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करुन ग्रेव्हीत घालावे आणि ५ मिनिटे मंद आचेवर पदार्थ शिजवून घ्यावा. हळदीची चव कमी होईल.