Join us

शिळा उसाचा रस पिऊन पडाल आजारी! पाहा काढल्यानंतर उसाचा रस ‘किती’ वेळात प्यायला हवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 16:19 IST

Within How Much Time You Should Consume Sugarcane Juice : How fast does sugarcane juice expire : What is the right time to drink sugarcane juice : थंडगार हवा म्हणून उसाचा रस तासंतास फ्रिजमध्ये ठेवून मग पिताय, थांबा...

उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस पिण्याचे सुख: आणि आनंद काही वेगळाच असतो. आपल्यापैकी बहुतेकजण उन्हाळ्यात उसाचा रस अगदी आवडीने पितात. या दिवसांत उसाचा रस पिणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. उसाच्या रसात पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय यात मॅग्नेशियम, कॅल्शियमही (How fast does sugarcane juice expire) असते. उन्हाळ्यात बरेचदा आपल्याला उष्णता आणि गरमीमुळे थकवा, डिहायड्रेशनची समस्या सतावते. अशा परिस्थिती, उसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळून आराम पडतो(Within How Much Time You Should Consume Sugarcane Juice).

उसाचा रस पिण्यासाठी आपण गुऱ्हाळाजवळ किंवा रसवंतीगृहात जातो, परंतु काहीवेळा आपल्याला कंटाळा येतो. तर कधी रणरणत्या उन्हामुळे गाड्याजवळ उभे राहून रस पिण्यापेक्षा तो पार्सल करून घरी आरामात बसून पिणे अनेकांना सोयीचे वाटते. अशावेळी आपण हा उसाचा रस चक्क पार्सल करून घरी आणतो, आणि मग काहीवेळा तो पितो. परंतु असे करणे योग्य आहे का ? उसाचा रस  गुऱ्हाळातून काढल्यानंतर तो एका ठराविक वेळेत पिऊन संपवणे गरजेचे असते. असे न केल्यास उसाच्या रसाचे संपूर्ण फायदे आपल्या शरीराला मिळत नाहीत सोबतच काहीवेळा फायद्याऐवजी नुकसानच होते. यासाठी उसाचा रस नेमका कितीही वेळात प्यावा, आणि पिण्याची योग्य वेळ कोणती ते पाहा. 

उसाचा रस कधी दिवसांतील कोणत्या वेळी प्यावा ? 

उसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात पण योग्यवेळी प्यायल्यानंतरच त्यामुळे फायदा होतो. उसाचा रस  दुपारी किंवा दुपार होण्याच्या आधी प्यायला हवा. याशिवाय उसाचा रस उभं राहून न पिता बसून प्यायला हवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा उसाचा रस प्यायल्यास शरीराला गारवा मिळतो आणि डिहायड्रेशनचा त्रासही होत नाही. 

मशिनशिवाय घरीच करा गाड्यावर मिळतो तसा उसाचा रस, थंडगार रसाची इन्स्टंट रेसिपी - वाटेल फ्रेश...

उसाचा रस कसा प्यावा ?  

उसाचा रस नेहमी ताजाच प्यायला हवा. फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळा. सोबतच थंड आणि बराच वेळ काढून ठेवलेला रस प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही त्यात पुदीना आणि लिंबाचा रसही मिक्स करू शकता काही लोक उसाच्या रसात काळं मीठ घालणं पसंत करतात. उसाचा रस प्यायल्याने शरीराला गारवा मिळण्यास मदत होते. उसाच्या रसाचे अधिकाधिक फायदे मिळण्यासाठी तो नेहमी ताजा असतानाच पिणे योग्य ठरेल. 

दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...

उसाचा रस काढल्यानंतर तो किती वेळात पिऊन संपवावा ? 

उसाचा रस काढल्यानंतर तो १५ मिनिटांच्या आत पिऊन संपवणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. १५ मिनिटानंतर, या रसामध्ये ऑक्सिडायझेशन होण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे उसाच्या रसाचा रंग बदलून हळूहळू काळा पडू लागतो, सोबतच त्याची चव आणि टेक्श्चर देखील बदलत जाते. उसाचा रस बराच वेळ काढून तसाच ठेवला तर त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ लागते, ज्यामुळे तो लवकर खराब होतो. असा बराच वेळ ठेवलेला उसाचा रस प्यायल्याने आपल्या आरोग्याला त्याचे फायदे मिळण्याऐवजी नुकसानच होते.

टॅग्स :अन्नसमर स्पेशलआरोग्यहेल्थ टिप्स