थंडीच्या दिवसात गरमागरम चहाबरोबर किंवा जेवताना तोंडी लावणीसाठी आवर्जून भजी खाल्ल्या जातात. बटाटा, मिरची, कांदा, पालकाच्या भज्या अनेक घरांमध्ये बनवल्या जातात. कधी भजी बनवायचा मूड झाला आणि घरात बेसन नसेल तर काय करावं सुचत नाही. बेसनाशिवाय भजी बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स या लेखा पाहूया (How to make pakode without besan)
बेसनाच्या वापराची आपल्याला इतकी सवय झालेली असते की बेसनाशिवाय भजी बनवता येतात याबद्दल आपण कधीच विचार केला नसेल. भजींचे पण खूप प्रकार आहेत. बेसनाऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पीठाचा वापर करून उत्तम भजी करू शकता. (Cooking Tips And Tricks)
१) गहू
तुम्ही भजी बनवण्यासाठी २ चमचे तांदळाचं पीठ, २ चमचे गव्हाचं पीठ आणि २ चमचे रवा घालून मिश्रण तयार करू शकता.
२) रवा
रव्याचा वापर तुम्ही भजी बनवण्यासाठी करत असाल तर ४ ते ५ पाच मोठे चमचे तांदळाचं पीठ एकत्र करा.
३) तांदळाचं पीठ
भजीचं मिश्रण तयार करताना तांदळाचं पीठ वापरत असाल तर भजी बनवण्यासाठी तुम्हाला जवळपास १ ते दीड कप पाणी लागू शकतं. तांदळाचं पीठ तेल जास्त शोषून घेते.
४) शिगाड्याचं पीठ
तुम्ही बेसनाऐवजी शिंगाड्याचं पीठही वापरू शकता. यासाठी १ कप शिंगाड्याचं पीठ लागेल. शिंगाड्याचं पीठ जास्त पातळ करू नका.
५) उडीदाच्या डाळीची पेस्ट
उडीदाच्या डाळीची पेस्ट भजीच्या पिठातही काम करू शकते. तुम्ही तुमच्या सातत्यानुसार ते बनवू शकता. पण ते खूप पातळ किंवा जास्त घट्ट नसावे अन्यथा पकोडे खूप तेलकट होतील
6) मुगाची डाळ
तुम्ही मूगाची डाळ वाटून भजी बनवू शकता किंवा त्यात काही स्टफिंग एड करू शकता किंवा कॉर्नफ्लोरही वापर केला जाऊ शकतो.