रोजचं जेवण बनवताना वाटण किंवा ग्रेव्ही एकदाच तयार करून ठेवली असेल तर रोजचं जेवण तयार होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. फ्रिजमधून काढून वाटणं भाजीत घातलं की १० मिनिटात चवदार, भाजी तयार होते. (Without onion garlic gravy recipe) उपवास असल्यास किंवा उन्हाळ्यात तब्येतीला गरम पडतं म्हणून अनेकजण कांदा, लसूण खाणं टाळतात.
काहीवेळा तोंडाला बराचवेळ वास येतो म्हणून कांदा लसूण, खाणं टाळलं जातं. बिना कांदा, लसणाची चवदार ग्रेव्ही कशी करायची ते पाहूया. (Curry without onion and garlic recipe all purpose curry base) कांदा न आवडणाऱ्यांसाठी स्वयंपाकात या ग्रेव्ही रेसिपीज खूप फायदेशीर ठरतील. (Curry without onion and garlic recipe)
गेव्ही रेसिपी-१
ही ग्रेव्ही करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तेल गरम करून ठेवा. त्यात तमालपत्र, लवंग घालून परतवून घ्या. शिमला मिरची, काजू , आल्याचे तुकडे घाला हे परवून घेतल्यानंतर त्यात टोमॅटो, चिमुटभर हळद, एक वाटी जीरं, धणे, लाल मिरच्या, मीठ घाला.
ना मावा, ना कन्डेंस मिल्क; फक्त ३ ब्रेड स्लाईसचे करा गारेगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी
ग्रेव्ही रेसिपी- २
एक चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पावडर एका भांड्यात पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात पाणी घालून या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार करा. एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग घाला नंतर ही पेस्ट घाला. तेल सुटेपर्यंत हे मिश्रण शिजवा. तयार आहे बिना, कांदा लसणाची चवदार ग्रेव्ही.