Join us  

ना जास्त मेहनत, ना गॅसचा वापर-झटपट करा मलई बर्फी, सणासुदीसाठी स्पेशल डिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 2:19 PM

Without use of Gas, Tryout New Paneer Barfi Recipe दूध आटवून बर्फी करायची काही गरज नाही, गॅसचा वापर न करता - १० मिनिटात करा मलई बर्फी

प्रसंग कोणताही असो, 'आज कुछ तो मीठा बनता है' म्हणणारा एखादा व्यक्ती आपल्या घरात असतोच. अनेकांना सणवार नसेल तरी, गोड खाण्याची क्रेविंग्स होते. आपण अनेकदा फॅन्सी आणि इंटरनॅशनल डेझर्ट खाल्लेच असेल, पण देसी मिठाईंची गोष्टच निराळी. आता एका मागोमाग एक सणवार सुरु होतील. यादिवसात आपण बाजारातून मिठाई आणतोच. परंतु, अनेक मिठाईच्या दुकानात भेसळयुक्त मिठाई मिळते. त्यामुळे बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरातच मिठाई तयार करून पाहा.

आज आपण गॅसचा वापर न करता, मलाईयुक्त पनीरची बर्फी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही बर्फी तयार करण्यासाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. कमी वेळात - झटपट ही मिठाई तयार होते(Without use of Gas, Tryout New Paneer Barfi Recipe).

मलई बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य

पनीर

मिल्क पावडर

कोकोनट पावडर

मुठभर कडीपत्त्याची ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी, सोपी रेसिपी-चवीला भारी

पिठी साखर

फॉइल पेपर

चांदीचा वर्ख

कृती

सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये २५० ग्रॅम पनीर घ्या. त्याला हाताने छान कुस्कुरून घ्या. त्यात अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप कोकोनट पावडर, तीन टेबलस्पून पिठी साखर घालून मिक्स करा. ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो, त्याच प्रमाणे हाताने पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्याला लांबट गोल आकार द्या.

कांदा-लसूण न घालता करा ढाबास्टाइल गरमागरम काला चना मसाला, फक्त १५ मिनिटांत चमचमीत रेसिपी

फॉइल पेपर किंवा बटर पेपर घ्या, त्यावर तयार पीठ ठेऊन रोल करा. व ६० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. मिठाई सेट झाल्यानंतर फ्रिजमधून बाहेर काढा. व त्यावर चांदीचा वर्ख लावून मिठाईचे काप करा. अशा प्रकारे गॅसचा वापर न करता, मलई बर्फी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स