Lokmat Sakhi >Food > छोले डोसा असा पदार्थ कधी कुणी खाते का? ही कोणती भलती उत्तर दक्षिण प्रेमकहाणी...

छोले डोसा असा पदार्थ कधी कुणी खाते का? ही कोणती भलती उत्तर दक्षिण प्रेमकहाणी...

Woman Says Dosa With Chole Tastes Better Than Dosa With Sambar & Internet Disapproves : साऊथचा डोसा उत्तरेचे डोसे असा पदार्थ कुणी का खात असेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 06:18 PM2023-03-23T18:18:48+5:302023-03-23T18:26:06+5:30

Woman Says Dosa With Chole Tastes Better Than Dosa With Sambar & Internet Disapproves : साऊथचा डोसा उत्तरेचे डोसे असा पदार्थ कुणी का खात असेल?

Woman Says Dosa With Chole Tastes Better Than Dosa With Sambar & Internet Disapproves | छोले डोसा असा पदार्थ कधी कुणी खाते का? ही कोणती भलती उत्तर दक्षिण प्रेमकहाणी...

छोले डोसा असा पदार्थ कधी कुणी खाते का? ही कोणती भलती उत्तर दक्षिण प्रेमकहाणी...

'डोसा' ही एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय पाककृती आहे ज्याचा आनंद जगभरातील अनेकजण घेतात. 'डोसा' हा एक असा पदार्थ आहे की जो आपण सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. आपण रस्त्यांवरच्या ठेल्यावर आतापर्यंत शेजवान डोसा, मसाला डोसा, म्हैसूर डोसा, चीज डोसा, जीनी डोसा असे अनेक डोश्याचे  प्रकार आतापर्यंत खाल्ले असतील. सहसा डोसा हा खोबऱ्याची चटणी किंवा गरमागरम सांबर सोबत खाण्यासाठी सर्व्ह केला जातो.

पांढऱ्या शुभ्र खोबऱ्याची चटणी व झणझणीत सांबर यांच्यासोबत डोसा खाण्याची मजा काही औरच असते. आपल्याकडे डोसा जितका लोकप्रिय आणि आवडीने खाल्ला जातो तितक्याच आवडीने छोले, भटुरे देखील खाल्ले जातात. आपल्याकडील कधी ठराविक पदार्थ हे त्याच्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या साइड डिश सोबतच चांगले लागतात. पराठा - दही, छोले - भटुरे, जिलेबी - रबडी, इडली - सांबार असे अनेक पदार्थ आहेत. परंतु आपण डोसा कधी छोल्यांसोबत खाऊन पाहिला आहे का ? सध्या इंटरनेटवर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसणाऱ्या पदार्थांची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे(Woman Says Dosa With Chole Tastes Better Than Dosa With Sambar & Internet Disapproves).  

नक्की काय आहे हा प्रकार ? 

अदिती नामक एका ट्विटर युजरने, Aditi(@Sassy_Soul) या मायक्रोब्लॉगिंग साइटवर नारळाच्या चटणीसह डोसा आणि त्याच्या शेजारी एक वाटी छोले असा एक फोटो शेअर केला आहे. तिच्या कॅप्शनमध्ये अदितीने नमूद केले आहे की तिने नाश्त्याला छोलेसोबत डोसा खाल्ला होता आणि तो सांबारासोबत खाल्लेल्या डोशापेक्षा चवीला खूपच चांगला लागला. उत्तर भारतीय छोलेसोबत जोडलेल्या दक्षिण भारतीय डिशचे हे असामान्य मिश्रण हे चांगले राष्ट्रीय एकत्मकतेचे प्रतीक म्हणता येईल. पण त्याची चव नेमकी कशी लागत असेल याचा विचार करुनच नेटकरी चकित झाले आहेत. 

जलेबी तेरा अंग्रेजी नाम क्या है? पाकिस्तानी हॉटेलने इंग्रजीत सांगितलं जिलेबी म्हणजे काय...


नेटकऱ्यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे? 

१७ मार्च रोजी शेअर केलेल्या या ट्विटला ५८००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि या फोटोला लाईक्स व कमेंट्स करणाऱ्यांची संख्या अजूनही वाढत आहे. हा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही तासातच नेटकऱ्यांनी यांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी हा फोटो बघून यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने यावर कमेंट करत नमूद केले आहे की, ओडिशातील लोक मटर, छोलेसोबत उत्तपमचा स्वाद घेतात तसेच छोले आणि डोस्याचे हे कॉम्बिनेशन खाऊन पहाण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. "मला देखील छोल्यासोबत डोसा खायला खूपच आवडतो असे म्हणत ही माझ्यासारखीच आहे, असे म्हणत एका युजरने कमेंट केली आहे. डोसा - छोले हे कॉम्बिनेशन व याची टेस्ट कशी लागते हे पाहण्यात काहींना रस आहे, तर अनेकांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली. काही नेटकऱ्यांनी तर या फूड ब्लॉगर्सच्या पावलावर पाऊल ठेवू नका असा इशारा दिला आहे. काही नेटिझन्स हे कॉम्बिनेशन टेस्ट करुन  पहायला उत्सुक होते, तर काही जण एकदम नाराज झाले आणि इतरांना ते 'पचणे' जमलेले दिसत नाही. एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, डोसा सामान्यतः नारळाची चटणी आणि इतर चटण्यांसोबत खायला अधिक चांगला लागतो. तसेच इडली सहसा सांबारसोबत चांगली लागते. नान, चपाती आणि रोटी यांसोबत छोले खाण्यासाठी उत्तम लागतात.

Web Title: Woman Says Dosa With Chole Tastes Better Than Dosa With Sambar & Internet Disapproves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.