Join us  

करा परफेक्ट बेकरी स्टाइल फ्लफी व्हॅनिला केक, घरी केलेला केकही फुलेल भरपूर-लागेल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2023 5:12 PM

Perfect Recipe of Vanilla Cake - stays moist 4 days! घरच्याघरी व्हॅनिला केक बनवण्याची परफेक्ट कृती, केक फसण्याची शक्यताच नाही

केक बनवणे ही सोपी गोष्ट नाही, मात्र प्रोसेस समजली तर अवघड देखील नाही. प्रत्येक महिलेची इच्छा असते की तिने एकदातरी केक बनवावा. काहींना केक बनवणे फार किचकट वाटते. पण, ही एक कला आहे, ज्याला ही कला जमली त्याचा केक कधीच फसणार नाही. केक बनवण्यासाठी केकचा बेस महत्वाचा असतो. प्रत्येक साहित्य प्रमाणात मिक्स झाल्यावर केक उत्तम फुलतो.

मुख्य म्हणजे जर आपण केकचा बेस बनवायला शिकलो तर, इतर प्रोसेस लवकर शिकू शकतो. बेस तयार झाल्यानंतर त्यावर आपण क्रीमची फ्रॉस्टिंग करून, केकला आवडीनुसार सजवू शकता. चला तर मग व्हॅनिला केक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? बेस बनवण्याची नेमकी प्रोसेस काय? बेस फसणार नाही याची काळजी कशी घ्यावी? याबाबतीत माहिती घेऊयात(Perfect Recipe of Vanilla Cake - stays moist 4 days).

बेसिक व्हॅनिला केक बेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य

दीड कप मैदा

पाव कप दुध

१ कप साखर

पाउण कप मिल्क पावडर

चवीनुसार मीठ

पाउण कप बटर

व्हॅनिला चिप्स

व्हॅनिला इसेन्स

बेकिंग सोडा - १ चमचा

बेकिंग पावडर - १ चमचा

अॅप्पल साईडर व्हिनेगर - अर्धा चमचा

घरी केक छान फुलत नाही? ९ टिप्स, केक होईल हलका - परफेक्ट छान

असा बनवा व्हॅनिला स्पंज केक

सर्वप्रथम, एक मोठा बाऊल घ्या, त्या बाऊलमध्ये साखर, मिल्क पावडर, दुध आणि बटर घाला. आता हे साहित्य  व्हिस्करच्या मदतीने फेटून घ्या. हे साहित्य व्यवस्थित फेटून झाल्यानंतर त्यावर एक चाळण ठेवा, त्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ घाला आणि नीट चाळून घ्या. चाळून झाल्यावर मिश्रण नीट मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ झाले नाही पाहिजे याची खात्री घ्या, पीठ मध्यम पातळ झाले पाहिजे. मिश्रण तयार झाल्यानंतर यात व्हॅनिला इसेन्स, अॅप्पल साईडर व्हिनेगर मिक्स करून घ्या. अशा प्रकारे बॅटर रेडी झाले आहे.

आता खा मस्त गारेगार नो ऑइल दही-वडा! सोपी रेसिपी-तेलकट खाण्याचं टेंशनच नाही..

आता एक बेकिंग ट्रे घ्या, त्याला ब्रशने थोडे बटर लावून ग्रीस करा. आता त्यावर बटर पेपर ठेवा, व तयार मिश्रण त्यात ओतून घ्या. तोपर्यंत ओव्हन १६० डिग्री सेल्सियसवर ५ ते १० मिनिट प्री – हिट करून घ्या. बेकिंग ट्रे प्री – हिट झालेल्या ओव्हनमध्ये ठेवा. साधारण ४५ मिनिटे १६० डिग्री सेल्सियसवर केक बेक करून घ्या. त्यानंतर बेकिंग ट्रे बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. केकवर व्हॅनिला चिप्स घालून सर्व्ह करा. अशा प्रकारे व्हॅनिला स्पंज केक रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स