Lokmat Sakhi >Food > कवठाची चटकमटक आंबटगोड चटणी, झटपट ५ मिनिटांत तयार, बघा चटकदार रेसिपी

कवठाची चटकमटक आंबटगोड चटणी, झटपट ५ मिनिटांत तयार, बघा चटकदार रेसिपी

Tasty, Delicious Wood Apple or Kavath Chutney: सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कवठं विकायला आली आहेत. त्याची आंबटगोड, चटकदार चटणी एकदा तरी नक्कीच करून बघा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 01:05 PM2022-12-01T13:05:03+5:302022-12-01T13:06:35+5:30

Tasty, Delicious Wood Apple or Kavath Chutney: सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कवठं विकायला आली आहेत. त्याची आंबटगोड, चटकदार चटणी एकदा तरी नक्कीच करून बघा.. 

Wood apple or Kavath chutney recipe, How to make wood apple or kavath chutney? | कवठाची चटकमटक आंबटगोड चटणी, झटपट ५ मिनिटांत तयार, बघा चटकदार रेसिपी

कवठाची चटकमटक आंबटगोड चटणी, झटपट ५ मिनिटांत तयार, बघा चटकदार रेसिपी

Highlightsवर्षभरातून केवळ दिड ते दोन महिनेच उपलब्ध असणारं हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. त्यामुळे ते जेव्हा उपलब्ध असेल, तेव्हा त्याचा लाभ शरीरासाठी जरूर करून घेतला पाहिजे.

हिवाळा असला की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची नुसती रेलचेल असते. कवठ देखील याच दिवसांत बाजारात येतात. त्यामुळे सध्या सगळीकडेच मुबलक प्रमाणात कवठं (kavath or wood apple) दिसत आहेत. एरवी वर्षभर हे फळ बघायलाही मिळत नाही. वर्षभरातून केवळ दिड ते दोन महिनेच उपलब्ध असणारं हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. त्यामुळे ते जेव्हा उपलब्ध असेल, तेव्हा त्याचा लाभ शरीरासाठी जरूर करून घेतला पाहिजे. कवठामध्ये गूळ कालवून खाण्याची पद्धत तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. आता त्याच कवठाची चटकमटक, आंबट- गोड- तिखट अशी चवदार चटणी कशी करायची त्याची ही सोपी रेसिपी..(Tasty, Delicious Kavath chutney recipe)

 

कशी करायची कवठाची चटणी?
साहित्य

१ मध्यम आकाराचं कवठ. या चटणीसाठी आपण कच्चं किंवा पिकलेलं अशा दोन्ही प्रकारची कवठं वापरू शकतो.

अर्धी वाटी गूळ

६ ते ७ हिरव्या मिरच्या, तिखट खाण्याच्या सवयीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी- जास्त करू शकता.

रडणाऱ्या ताईला पाहून कासाविस झालाय चिमुकला, बघा तिला कसं समजावतोय... व्हायरल इमोशनल व्हिडिओ 

१ टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी अर्धा टेबलस्पून तेल, मोहरी आणि हिंग

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी कवठ फोडून त्याच्यातल्या शीरा काढून टाका. बिया काढण्याची गरज नाही. 

२. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कवठाचा सगळा गर, गूळ, हिरव्या मिरच्या, जिरे आणि चवीनुसार मीठ असं सगळं साहित्य टाकून ते चांगलं बारीक वाटून घ्या.

वेटलॉस करताना बहुतेक सगळेच जण करतात ३ मोठ्या चुका.. बघा तुम्हीही इथेच चुकताय का?

३. ही चटणी आता एका वाटीत काढून घ्या.

४. एका छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी घालून फोडणी करून घ्या. वरतून चिमूटभर हिंग घाला. ही फोडणी आता चटणीवर घाला आणि सगळी चटणी एकदा व्यवस्थित कालवून घ्या. कवठाची चटपटीत चटणी झाली तयार.

५. ही चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर चांगली टिकू शकते. पराठा, पोळी यासोबत किंवा जेवणात तोंडी लावायला अतिशय चवदार लागते. 
 

Web Title: Wood apple or Kavath chutney recipe, How to make wood apple or kavath chutney?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.