चहाचे शौकिन जसे असतात, तसे आता आपल्या आजुबाजुला कॉफी लव्हर्सही (coffee lover) वाढले आहेत. एक कप कॉफी घेतली की त्यांना तरतरी येते आणि कामासाठी नवा हुरूप येतो. अर्थात कॉफी लव्हर्समध्ये तरुणांची संख्या निश्चितच अधिक आहे. १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कॉफी दिवस म्हणून ओळखला जातो. कॉफी डे च्या निमित्ताने आता जगभरातली सर्वाधिक महागडी कॉफी (Most expensive coffee of the world) कोणती ते आता बघू या.. सिवेट कॉफी (Civet coffee) ही जगातली सगळ्यात महागडी काॅफी म्हणून ओळखली जाते.
याच कॉफीला कॉफी लुवाक असं म्हणूनही ओळखलं जातं. खरंतर ही कॉफी कशी तयार होते, याची पद्धत पाहिली तरीही अनेक जण नाक मुरडतील किंवा अशा पद्धतीने तयार होणारी कॉफी एवढी महाग कशी असू शकते, असा प्रश्न स्वत:ला विचारतील. पण तिच खरी या कॉफीची खासियत आहे. जागतिक बाजारपेठेत २० ते २५ हजार रुपये प्रति किलो या दराने ही कॉफी मिळते. तर कॉफीचा एक कप घेण्यासाठी तब्बल ६ ते ८ हजार रुपये मोजावे लागतात. मागील काही वर्षांपासून ही कॉफी भारतातही तयार होऊ लागली आहे. अमेरिका, युरोप या भागात या कॉफीचे उत्पादनही सगळ्यात जास्त होते आणि तिथले श्रीमंत लोक मोठ्या हौशीने ही कॉफी घेतात.
कशी तयार होते सिवेट कॉफी?सिवेट कॉफी तयार करण्यासाठी सिवेट या मांजरीप्रमाणे असणाऱ्या एका प्राण्याची गरज असते. या प्राण्याला कॉफीची चेरी खायला देतात.
World Vegetarian Day: ८ सेलिब्रिटी, जे आज आहेत शुद्ध शाकाहारी! बघा का सोडलं त्यांनी कायमचं नॉनव्हेज
त्यातला काही भाग त्या प्राण्याला पचतो तर काही भाग म्हणजेच कॉफीच्या बिया तो न पचल्यामुळे वेस्ट प्रोडक्ट म्हणून शरीराबाहेर टाकून देतो. या कॉफीच्या बियांना शुद्ध केले जाते आणि त्यापासून सिवेट कॉफी तयार केली जाते. या कॉफीमध्ये असणारे काही एन्झाईम्स शरीरासाठी अतिशय पोषक असतात. त्यामुळे या कॉफीची किंमत एवढी जास्त आहे, असे सांगितले जाते.