Lokmat Sakhi >Food > world milk day 2022 : दूध रोज प्यायलाच हवं का? दूध पिण्याविषयी ६ गैरसमज, चुकतं ते इथंच..

world milk day 2022 : दूध रोज प्यायलाच हवं का? दूध पिण्याविषयी ६ गैरसमज, चुकतं ते इथंच..

world milk day 2022: 1 ग्लास दूध पिताना आपण 6 गैरसमज बाळगतो.. दूध पिण्याआधी गैरसमज दूर करणं आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 04:36 PM2022-06-01T16:36:13+5:302022-06-01T16:43:35+5:30

world milk day 2022: 1 ग्लास दूध पिताना आपण 6 गैरसमज बाळगतो.. दूध पिण्याआधी गैरसमज दूर करणं आवश्यक आहे.

world milk day 2022: Do I have to drink milk every day? 6 Misconceptions About Drinking Milk | world milk day 2022 : दूध रोज प्यायलाच हवं का? दूध पिण्याविषयी ६ गैरसमज, चुकतं ते इथंच..

world milk day 2022 : दूध रोज प्यायलाच हवं का? दूध पिण्याविषयी ६ गैरसमज, चुकतं ते इथंच..

Highlightsदुधामधून कॅल्शियम हा घटक मिळतो हे खरं असलं तरी केवळ दुधातूनच कॅल्शियम मिळतं हे मात्र खरं नाही.शरीरास आवश्यक पोषण मुल्यांसाठी दूधच प्यायला हवं असं नाही.दूध हे पूर्ण अन्न असलं तरी ते जेवणाला पर्याय असू शकत नाही.

world milk day 2022: आरोग्यासाठी आहाराचा विचार करताना दुधाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. दूध म्हणजे पूर्ण अन्न. दुधातून प्रथिनं, फॅटस, कर्बोदकं हे तीन महत्त्वाचे घटक मिळतात. तसेच या तीन मुख्य घटकांसोबतच ब जीवनसत्व, कॅल्शियम, पोटॅशिय आणि मॅग्नेशियम ही सूक्ष्म पोषणमुल्यंही दुधामध्ये असतात. दुधाच्या या गुणधर्मांमुळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आहारात दूध आवश्यक समजलं जातं. दुधाचा समावेश आहारात केल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात हे खरं असलं तरी दूध पिताना दुधाबद्दलचे चुकीचे समज बाळगले जातात. दुधाबद्दलच्या चुकीच्या समजुतींमुळे दूध आणि आरोग्य याभोवतीचं गूढ अधिक गडद होतं. दुधाबद्दलची योग्य शास्त्रीय माहिती दुधाबद्दलचे 6 गैरसमज दूर करण्यास पुरेशी आहे. 

Image: Google

दूध आणि गैरसमज

1. दूध हा कॅल्शियम मिळवण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

दुधामधून कॅल्शियम हा घटक मिळतो हे खरं असलं तरी केवळ दुधातूनच कॅल्शियम मिळतं हे मात्र खरं नाही.  यासाठी आहारतज्ज्ञ कॅल्शियमयुक्त अनेक घटकांचे दाखले देतात. दोन चमचे चिया सीड्स दिवसातून सहा वेळा खाल्ल्यास दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन इन इंडियाच्या संदर्भानुसार 100मिली दुधामध्ये 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. तर 100 ग्रॅम नागलीमध्ये 344 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं. तज्ज्ञांच्या मते वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर शरीराची दुधातील प्रथिनांची साखळी तोडण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दुधातील कॅल्शियम शरीराकडून पुरेसं शोषलं जात नाही. पदार्थातील कॅल्शियम शोषून घेण्यासाठी शरीरात पुरेसं ड जीवनसत्व असणं आवश्यक असतं. 

2. दूध सारखं तापवल्यानं दुधातील पोषक घटक नष्ट होतात.

डेअरीतून दूध आणल्यानंतर त्यातील घातक जिवाणू नष्ट होण्यासाठी ते व्यवस्थित तापवून घेणं आवश्यक असतं. पॅकेज्ड दुधावर पाश्चराइज्ड ही प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे ते तापवावं न तापवावं हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. पण म्हणून हे दूध तापवल्यानं दुधात असलेले पोषक घटक नष्ट होत नाही. पोषण तज्ज्ञ शालिनी मंगलानी सांगतात की दूध कितीही वेळा तापवलं तरी त्यातील पोषण घटकांवर परिणाम होत नाही. तापवल्यानं दुधातील पोषण मुल्यं कमी होत नाही. 

Image: Google

3. सकाळी उठल्या उठल्या दूध प्यावं.

सकाळी नाश्त्याला दूध पिल्यानं शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. पण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी दूध पिणं ही योग्य बाब नव्हे. जर पचनाशी निगडित समस्या असतील तर सकाळी उठल्या उठल्या दूध पिणं योग्य नव्हे. तज्ज्ञ म्हणतात अशा परिस्थितीते रिकाम्या पोटी ताक प्यायल्यास पचनास मदत होते. सूक्ष्म पोषणमुल्यं तज्ज्ञ शिल्पा अरोरा यांच्या मते कफ आणि वात दोष असलेल्यांनी रिकाम्या पोटी दूध पिऊ नये. 

4. दिवसातून दोन ग्लास दूध प्यायला हवं !

दूध हे आरोग्यास उत्तम असलं तरी रोज दिवसातून दोन वेळेस ग्लासभर दूध प्यायल्यानं शरीराची पोषणाची गरज पूर्ण होत नाही. आहारात दूध आणि दुधाचे पदार्थ आवश्यक असतात. दुधासोबतच दही, चीज यासारखे पदार्थ सेवन करणंही आवश्यक असतं. रोज दूध पिणं हा आवडी निवडीचा भाग असू शकतो पण शरीरास आवश्यक पोषण मुल्यांसाठी दूधच प्यायला हवं असं नाही. शरीरास आवश्यक पोषण मुल्यांसाठी केवळ दुधावर अवलंबून राहाणं योग्य नाही. 

Image: Google

5. दूध पिल्यानं पोट फुगतं.

ज्यांना दुधातील लॅक्टोज या घटकाची ॲलर्जी असते त्यांच्याबाबतीत दूध पिल्यानं पोट फुगतं, पोटाशी निगडित समस्या निर्माण होतात हे खरं आहे. पण सामान्यत: केवळ दूध पिल्यानं पोट फुगतं हे चुकीचं आहे. पण दुधासोबत फळं खाल्ल्यास पचनाशी निगडित समस्या निर्माण होतात असं पोषण तज्ज्ञ शिल्पा अरोरा म्हणतात. दूध पिल्यानं निर्माण होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी दूधात दालचिनी आणि थोडी हळद घालावी किंवा तुळशीची पानं घालून दूध उकळून पिल्यास पोटाच्या समस्या निर्माण होत नाही. 

6. जेवणाऐवजी दूध प्यायलं तरी चालतं.

दूध हे पूर्ण अन्न असलं तरी ते जेवणाला पर्याय असू शकत नाही. दुधात असलेल्या पोषण मुल्यांसोबतच शरीराला लोह, क जीवनसत्व, फायबर यांची आवश्यकता असते. हे घटक दुधामध्ये नसतात. जेवणाऐवजी केवळ दूध प्याल्यास शरीरास उष्मांकाची कमतरता भासते. त्याचा परिणाम आरोग्यावर आणि शरीराच्या विकासावर होतो. दूध हा आपल्या रोजच्या आहारातला एक घटक आहे पण म्हणून दूध म्हणजे पूर्ण आहार नव्हे. पचनाशी निगडित समस्या नसतील आणि आपण पित असलेलं दूध चांगल्या दर्जाचं असल्यास दूध पिणं उत्तम बाब असल्याचं आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, पण त्याचबरोबर संतुलित आहार घेण्याचा सल्लाही देतात. 


 

Web Title: world milk day 2022: Do I have to drink milk every day? 6 Misconceptions About Drinking Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.