वडा पाव हा महाराष्ट्राचा आवडीचा पदार्थ. सकाळ असो किंवा संध्याकाळ असो. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले आणि आपण घराबाहेर असू तर हमखास एखाद्या गाड्यावर तो अगदी स्वस्तात मिळून जातो आणि आपली मोठी भूक भागवायला पुरेसा ठरतो. वडापाव सोबत एखादी तळलेली मिरची मिळाली तर मग आहाहा... घराबाहेर पडल्यावर स्वस्तात मस्त चवदार काही खायचं असेल, तर वडापाव त्या यादीत पहिल्या स्थानावर येतो. या पदार्थाची लोकप्रियता पाहूनच २३ ऑगस्ट (23 August) हा दिवस जागतिक वडापाव दिवस (World Vada Pav Day 2023: ) म्हणून ओळखला जातो. आता या निमित्त वडापाव मधल्या बटाटेवड्याच्या पीठाचं आवरण कसं परफेक्ट करायचं ते पाहूया (How to make perfect batate vada for vada pav)..
बटाटेवडा करण्यासाठी डाळीचं पीठ कसं भिजवायचं?१. बटाटेवडा करण्यासाठी डाळीचं पीठ भिजवताना आपण सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे शक्यतो बटाटेवडे करण्यासाठी बाजारात विकत मिळणारं बेसन वापरावं.
२. साधारण दिड कप डाळीचं पीठ घेतलं तर त्यात एक टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकावं. तांदळाच्या पीठामुळे वरचं आवरण मऊ पडत नाही. आवरणाला थोडासा कडकपणा येतो.
३. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, थोडंसं तिखट असं सगळं साहित्य एका भांड्यात एकत्र करावं. नंतर ते तसंच कोरडं हलवून घ्यावं. यामुळे पीठ मोकळं आणि हलकं होईल. त्यामुळे भिजवताना त्यात गाठी होणार नाहीत. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतरच थोडं थोडं पाणी टाकून भिजवावं.
सतत डोकं दुखतं- टेन्शन येतं? आणि केसही वाढत नाहीत? फक्त २ मिनिटांचा सोपा उपाय, करून बघा
४. साधारणपणे डोसा करताना पीठाचा पातळपणा जसा असतो, तशा पद्धतीनेच बटाटेवड्यांसाठी डाळीचं पीठ भिजवावं.
५. डाळीचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच वडे तळायला घेऊ नयेत. पीठ भिजवल्यानंतर ते अर्धा तास झाकून ठेवावं आणि नंतर वडे तळायला घ्यावेत.