Join us  

How to Make Sabudana Batata Papad : 'या' पद्धतीनं बनवा दुप्पट फुगणारे साबुदाणा-बटाटा पापड; ही घ्या चविष्ट, कुरकुरीत रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 6:57 PM

How to Make Sabudana Batata Papad : उपवासाचे पापड असतील तर तुम्ही पटकन तळू शकता, घरी आलेल्या पाहूण्यांचा उपवास असेल तरीही तुम्ही त्यांना असे पापड झटपट खायला देऊ शकता.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर घराघरातल्या बायका वर्षभरासाठी पापडांचे डब्बे भरून ठेवायला सुरूवात करतात. पापडं, कुरडया, सांडगे सगळं काही विकत मिळत असलं तरी घरी बनवण्याची मजाच काही वेगळी आहे. अनेकदा पैसे मोजूनही हवी तशी चव चाखायला मिळत नाही. (Cooking tips) वर्षभरात उपवासाच्या दिवशी ऐनवेळी काय बनवायचं सुचत नाही. (Sabudana Batata Papad Recipe)

उपवासाचे पापड असतील तर तुम्ही पटकन तळू शकता, घरी आलेल्या पाहूण्यांचा उपवास असेल तरीही तुम्ही त्यांना असे पापड झटपट खायला देऊ शकता. या लेखात दुप्पट फुगणारे साबुदाणे बटाटा पापड कसे बनवायचे ते सांगणार आहोत. (How to Make Sabudana Batata Papad)

(Image Credit- Crazy cooking Tips)

साहित्य

१ वाटी - साबुदाणे

2 - मोठे बटाटे 

2 टीस्पून - जिरे

चवीनुसार रॉक मीठ

कृती

1 कप साबुदाणे मिक्सरमध्ये घेऊन बारीक पावडर बनवा. नंतर साबुदाणा पावडर कोमट पाण्यात ६ तास भिजत ठेवा. 6 तासांनंतर साबुदाणा पावडर फुगेल. त्यातल्या गुठळ्या फोडून बाजूला ठेवा. 

नंतर बटाटे उकळून सोलून घ्या. बटाटे स्मॅश करून भिजवलेल्या साबुदाणा पावडरमध्ये घाला. त्यात जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण खूप चांगले मिसळा.

आता  साबुदाणा बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि एक स्वच्छ प्लास्टिक शीट घ्या. पीठ चिकट असेल तर हाताला थोडे पाणी लावा. बोटांच्या मदतीने बॉल एका पातळ डिस्कमध्ये पसरवा. सर्व पापड सारखे बनवा. पापड १-२ दिवस उन्हात वाळवा. ते हवाबंद डब्यात साठवा आणि गरजेनुसार वापरा.

१)

२) 

३) 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स