आपल्या रोजच्या आहारात डाळींना विशेष असे महत्व असते. रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश आवर्जून करतोच. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ अशा अनेक डाळी आपल्या आहाराचा महत्वाचा भाग असतातच. या सगळ्या डाळींमध्ये (How To Make Yellow Moong Dal Parantha At Home) आपण सगळ्यात जास्त पिवळ्या मूग डाळीचाच वापर करतो. मूग डाळीचा वापर खिचडी, डोसा, दलिया, भजी, हलवा हे पदार्थ करण्यासाठी होतो. मूग डाळ (Yellow Moong Dal Parantha Recipe) खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी-६, नियासिन, थायामिन आणि फोलेट आढळते. यात फायबर असल्यामुळे पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचते(Rajasthani Mung Dal Ka Paratha).
आयुर्वेदानुसार आहारात मूग डाळ असायला हवी. मूग डाळ सुपरफूड म्हणून मानली जाते. पचनाच्या बाबतीत इतर कडधन्यांपेक्षा ही लवकर पचते. कफ आणि पित्त संतुलित करण्यासाठी या डाळीचा आहारात समावेश केला जातो. यासह त्यात फायबर व प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. पिवळी मूग डाळ वापरुन आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करत असलो तरीही आपल्याला पिवळ्या मूग डाळीची खिचडीच सर्वात जास्त आवडते. परंतु पिवळ्या मूग डाळीची नेहमीची तीच ती खिडची करण्यापेक्षा आपण या डाळीचा पौष्टिक पराठा देखील करु शकतो. पिवळ्या मूग डाळीचा झटपट तयार होणारा पराठा कसा करायचा याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पिवळी मुगाची डाळ - १ कप
२. मीठ - चवीनुसार
३. हळद - १ टेबलस्पून
४. गव्हाचे पीठ - २ कप
५. काळे तीळ - १ टेबलस्पून
६. जिरे - १/२ टेबलस्पून
७. ओवा - १/२ टेबलस्पून
८. हिंग - १/२ टेबलस्पून
९. तेल - गरजेनुसार
१०. तूप - गरजेनुसार
११. पाणी - गरजेनुसार
आधीच लसूण महाग, त्यात चांगल्या क्वालिटीचा कोणता, हे कसं ओळखाल? शेफ पंकज सांगतात युक्ती...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पिवळी मुगाची डाळ घेऊन ती २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.
२. आता कुकरमध्ये स्वच्छ धुतलेली मूग डाळ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी आणि मीठ, हळद घालावे. २ ते ३ शिट्ट्या करून डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी.
३. एका मोठ्या डिशमध्ये गव्हाचे पीठ, काळे तीळ, जिरे, ओवा, हिंग, तेल घालावे. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली मूग डाळ थोडी मॅश करून घालावी.
वर्षभर टिकणारं ताज्या आवळ्याचं घरच्याघरीच करा चटपटीत लोणचं, चटकदार लोणच्याची खास रेसिपी...
४. आता हे सगळे जिन्नस एकत्रित करून चपातीचे पीठ मळतो त्याचप्रमाणे गरजेनुसार पाणी घेऊन पराठ्यांचे पीठ मळून घ्यावे.
५. पराठ्यांचे पीठ मळून झाल्यानंतर त्यावर रुमाल घालून ५ ते १० मिनिटे पीठ झाकून ठेवून द्यावे.
६. आता या मळून घेतलेल्या पिठाचे गोळे तयार करून पराठे लाटून घ्यावेत.
७. एका पॅनला आपल्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावून हा तयार पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
आपला पिवळ्या मूग डाळीचा पौष्टिक पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा मूगडाळीचा पराठा आपण सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.