Lokmat Sakhi >Food > चपाती करताना टाळा ४ चुका, तज्ज्ञ सांगतात या चुकांमुळे चपातीतील पोषण शरीराला मिळत नाही, कारण..

चपाती करताना टाळा ४ चुका, तज्ज्ञ सांगतात या चुकांमुळे चपातीतील पोषण शरीराला मिळत नाही, कारण..

You Are Making Your Roti WRONG! Here Are 4 Most Common Mistakes : चपाती करताना ४ चुका टाळले तर नक्कीच चपाती पौष्टीक तयार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 02:32 PM2023-10-12T14:32:35+5:302023-10-12T14:33:28+5:30

You Are Making Your Roti WRONG! Here Are 4 Most Common Mistakes : चपाती करताना ४ चुका टाळले तर नक्कीच चपाती पौष्टीक तयार होईल

You Are Making Your Roti WRONG! Here Are 4 Most Common Mistakes | चपाती करताना टाळा ४ चुका, तज्ज्ञ सांगतात या चुकांमुळे चपातीतील पोषण शरीराला मिळत नाही, कारण..

चपाती करताना टाळा ४ चुका, तज्ज्ञ सांगतात या चुकांमुळे चपातीतील पोषण शरीराला मिळत नाही, कारण..

भारतातील प्रत्येक घरात चपाती-भाजीचा बेत असतो. चपतीशिवाय जेवणाची थाळी अपूर्ण आहे. नाश्ता असो, किंवा लंच-डिनर. चपाती ही खाल्ली जातेच. काही ठिकाणी चपातीला, रोटी, पोळ्या किंवा फुलके असे म्हणतात. प्रत्येकाची चपाती करण्याची पद्धत वेगळी आहे. चपातीचं पीठ मळण्यापासून ते चपाती शेकण्यापर्यंत, प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने चपाती तयार करतो.

चपाती खाण्याचे फायदे अनेक आहेत. पण चपातीतील पोषण आपल्या शरीराला योग्यरित्या मिळते की नाही, हे आपल्याला कसं कळणार? कोणत्या चुकांमुळे चपातीतील पोषण आपल्याला शरीराला मिळत नाही, चपाती करताना कोणत्या चुका टाळाव्या याची माहिती आहारतज्ज्ञ लवलीन कौर यांनी दिली आहे(You Are Making Your Roti WRONG! Here Are 4 Most Common Mistakes).

मल्टीग्रेन चपाती खाणं टाळा

आहारतज्ज्ञांच्या मते, 'आपण मल्टीग्रेन चपाती खाणे टाळले पाहिजे. एकावेळी एकाच पिठापासून तयार चपात्या खा. त्यात इतर पीठ मिसळून चपाती करणे टाळा.'

नारळाच्या करवंटीत इडली? ' या ' रीतीने करून पाहा, अशी भारी इडली कधी खाल्ली नसेल

चपाती करताना कोणत्या चुका टाळायला हव्या?

मळलेल्या ताज्या पीठाच्या त्वरित चपात्या करू नका

काही जण घाई गडबडीत चपात्या तयार करतात. अशा वेळी चपात्या करताना काही महिला पीठ मळून झाल्यानंतर लगेच मळलेल्या पीठाचे चपात्या तयार करतात. पण असे करू नका.  ५ मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ पीठ मुरण्यासाठी ठेवा. यामुळे पीठातील चांगले बॅक्टेरिया वाढतील. ज्यामुळे नक्कीच शरीराला याचा फायदा होईल.

नॉन-स्टिक पॅनवर चपात्या शेकू नका

नॉन-स्टिक पॅनचा वापर सध्या वाढत चालला आहे. मात्र, चपाती शेकण्यासाठी नॉन-स्टिक पॅनचा वापर टाळावा. चपात्या नेहमी लोखंडी तव्यावर शेका.

बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

चपात्या अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेऊ नका

चपात्या फ्रेश-गरम ठेवण्यासाठी बरेच जण  अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. पण ही पद्धत चुकीची आहे. चपाती नेहमी सुती कापडात गुंडाळून ठेवा. यामुळे चपात्या फ्रेश राहतील.

Web Title: You Are Making Your Roti WRONG! Here Are 4 Most Common Mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.