Join us  

नाश्त्याला चहा चपाती खाता? आयुर्वेदीक तज्ज्ञ सांगतात चहा चपाती का खाऊ नये, ही आहे योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:48 PM

Chai and chapati in breakfast is it good for health : आयुर्वेदानुसार दूध आणि मीठाचे एकत्र सेवन करू नये.

चहा चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. सकाळी चपात्या बनवल्या की  नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाचीही सोय होते. म्हणून काहीजण चहाबरोबर चपाती खाणं पसंत करतात. हा नाश्ता खाल्ल्यानं बराचवेळ भूक लागत नाही. पोट भरलेलं राहतं असे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. चहा चपाती एकत्र का खाऊ  नये याबाबत आयुर्वेदीक डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे. (You are taking regular chai and chapati in breakfast is it good for health) चुकीच्या फूड कॉम्बिनेशन्समुळे अनेकदा स्किनचे आजार, केस गळण्याच्या समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी वेळीच खाण्यापिण्याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. 

1) आयुर्वेदानुसार दूध आणि मीठाचे एकत्र सेवन करू नये.

2) जर तुम्हाला चहा चपाती खायची असेल तर  चहा चपाती खायची असेल तर चपातीच्या कणकेत मीठ घालू नका किंवा  बिना दुधाचा चहा घ्या.

चहा चपाती खाण्याचे फायदे

१) दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं. जास्त भूक लागत नाही.

२) जर तुम्हाला खूप थकवा वाटत असेल नाश्त्याला चहा चपाती खाऊ शकता. यामुळे थकवा , अशक्तपणा दूर होईल. दूधासह चपातीचे सेवन केल्यानं थकवा  कमी जाणवतो.

३) शरीराला उर्जा मिळते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स