Join us

न्यूट्रिशनिस्टनुसार रात्रीच्या जेवणात 'या' ५ गोष्टी खाल्ल्या तर पोटात होते गडबड, पाहा काय टाळावं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:36 IST

Dinner Tips: साक्षी यांच्यानुसार, काही पदार्थ असे असतात जे रात्री खाणं टाळलं पाहिजे. हे पदार्थ जर रात्री खाल्ले तर पचन तंत्र बिघडतं. अशात हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.

Dinner Tips: रोजचा षौष्टिक आहार आपण निरोगी राहण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी किती महत्वाचा असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. जर योग्य आहार घेतला नाही तर आरोग्य बिघडतं. सामान्य लोक सकाळी आणि दुपारच्या जेवणात काय खावं याचं प्लॅनिंग करतात. पण रात्रीच्या जेवणाचा विचार कमीच केला जातो. रात्रीच्या जेवणात विचार न करता काहीही बनवलं जातं आणि खाल्लं जातं. पण अनेकांना हे समजत नाही की, जेवढी सकाळच्या खाण्याची काळजी घेतली जाते, तेवढीच रात्रीच्या जेवणाचीही काळजी घेणं गरजेचं असतं. कधी काय खावे आणि कधी काय खाणं टाळावं याचे काही नियम आहेत. न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. साक्षी यांच्यानुसार, काही पदार्थ असे असतात जे रात्री खाणं टाळलं पाहिजे. हे पदार्थ जर रात्री खाल्ले तर पचन तंत्र बिघडतं. अशात हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.

रात्री जेवणात काय खाऊ नये?

फळं किंवा फळांचा ज्यूस

फळं आणि फळांचा ज्यूस शरीराला पोषण मिळतं. मात्र, यातील हाय शुगरमुळे ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. ज्यामुळे रात्रीच्या झोपेचं खोबरं होऊ शकतं.

काकडी आणि बीट

काकडी आणि बीट रात्रीच्या वेळी सलादच्या रूपात खाल्ले जातात. दोन्ही गोष्टी थंड असतात आणि हे खाल्ल्यास रात्री पोटातील उष्णता कमजोर होते. ज्यामुळे पचनासंबंधी समस्या होऊ शकते. अशात रात्री काकडी आणि बीट खाऊ नये.

स्प्राउट्स

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक मोड आलेले मूग खातात. यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. अशात जे मोड आलेले कडधान्य रात्री खाल्ले तर पोटात गॅसची समस्या होऊ शकते. तसेच पोटात गडबड होऊ शकते. 

दही

रात्री वेगवेगळ्या पद्धतीनं लोक दही खातात किंवा साधं दही सुद्धात खातात. पण रात्री दही खाल्ल्यानं कफ वाढण्याचा धोका असतो. तसेच पचनक्रियाही व्यवस्थित होत नाही. 

पालक

फायबर आणि आयर्न भरपूर असलेली पालक भरपूर लोक आवडीनं खातात. पण पालक पचायला वेळ लागतो, ज्यामुळे ब्लोटिंगची समस्या होते. रात्री पालक खाल्ल्यास पोटात गडबड होऊ शकते.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स