Join us  

तेल- तूप मुळीच न घालता करा चमचमीत भाज्या, बघा झिरो ऑइल कुकिंगची खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 12:28 PM

Zero Oil Cooking Recipe: अगदी थेंबभरही तेल, तूप न घालता भाज्या कशा करायच्या, असं वाटत असेल तर हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच... (How to make sabji without adding oil or ghee)

ठळक मुद्देतेल न घालता चवदार भाजी कशी करायची (Zero oil cooking recipe), असा प्रश्न पडला असेल तर हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच.

आरोग्य चांगलं ठेवायचं तर तेलाचा वापर खूप मर्यादित करा, असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. पण तरीही बहुतांश घरांमध्ये भरपूर तेल घालूनच भाज्या केल्या जातात. भाज्यांना भरपूर तेल घातलं की त्यांची चव कशी छान खमंग येते, हा अनेकींचा गैरसमज असतो. त्यामुळे मग अगदी हातचं काहीही न राखता भरपूर तेल घातलं जातं. काही वेळा तर मसालेदार भाज्यांच्या तर्रीवर अक्षरश: तेलाचा थर जमलेला असतो. तेल न घालता चवदार भाजी कशी करायची (Zero oil cooking recipe), असा प्रश्न पडला असेल तर हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच. (How to make sabji without adding oil or ghee)

 

तेल- तूप न घालता कशी करायची भाजी?

झीरो ऑईल कुकींग रेसिपी saqqukirasoi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. या मध्ये डॉ. बिमल छाजेर यांनी अगदी थेंबभरही तेल- तूप न घालता भाज्या कशा करायच्या, हे सांगितलं आहे.

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

यामध्ये त्यांनी पनीरची भाजी करण्याची रेसिपी सांगितली आहे. त्यानुसार आपल्याला इतरही भाज्या करता येतील. 

सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की त्यात जिरे टाका. जिरे गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो कांदा हलवत राहा, जेणेकरून तो जळणार नाही.

 

यानंतर कांदा चांगला भाजून झाला की त्याच्यावर हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला आणि तुम्हाला पाहिजे ते इतर मसाले टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या.

लग्नकार्यात मराठमोळा लूक करण्यासाठी ६ पद्धतीने घ्या शेला, दिसाल एकदम रुबाबदार- ऐटबाज!

आता कांद्यामधला नैसर्गिक ओलावा संपला की कढईत थोडं थोडं पाणी घाला आणि भाजी हलवत राहा. यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो किंवा टोमॅटोची प्यूरी घाला. पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवा. कांदा- टोमॅटोचा कच्चा वास निघून गेला आणि सगळं मिश्रण छान एकजीव झालं की त्यात पनीर घाला आणि सगळं मिश्रण हलवून थोडं पाणी घालून वाफ काढून घ्या. पनीरची चवदार भाजी झाली तयार. अशाच पद्धतीने तुम्ही इतरही भाज्या करून पाहू शकता. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती