Join us  

१ वाटी बेसन - १ कप पाणी, यंदाच्या पावसात खाऊनच पाहा चमचमीत ‘झुणका वडी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 1:33 PM

Zunka vadi recipe | How to make north karnataka style jhunka पिठल्याची वडी किंवा झुणका वडी हा पदार्थ एकदा खाऊन पोट आणि मन भरतच नाही, घ्या रेसिपी

पावसाळा सुरु झाला की, खवय्यांची चंगळ सुरु होते. भाजलेला मका, गरमागरम भजी, वडापाव, वडी. हे पदार्थ चवीने खाल्ले जातात. बाहेर पाऊस पडला की घरात कुरकुरीत - खमंग पदार्थ केले जातात. कोणाला भजी तर कोणाला वडी खायला आवडतात. आपण पावसाळ्यात कोथिंबीर वडी, पालक वडी, मेथी वडी, कोबी वडी तयार करून खाल्ली असेल. पण आपण कधी झुणका वडी ट्राय करून पाहिली आहे का?

घरात भाजी तयार नसेल तर, आपण झटपट झुणका तयार करतो. झुणका भाकरी, चपाती व भातासोबत खायला भन्नाट लागतो. जर आपल्याला झुणक्यामध्ये ट्विस्ट हवा असेल तर, झुणक्याची वडी हा पदार्थ ट्राय करून पाहा. ही वडी कमी वेळात - कमी साहित्यात तयार होते(Zunka vadi recipe | How to make north karnataka style jhunka).

झुणक्याची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

तेल

मोहरी

आलं - लसूण पेस्ट

कांदा

कोथिंबीर

पाणी

लाल तिखट

१ कप गव्हाचं पीठ - अर्धा कप रवा, १० मिनिटांत करा गव्हाचा कुरकुरीत डोसा

धणे - जिरे पूड

तीळ

कृती

सर्वप्रथम, कढईत एक टेबलस्पून तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून मोहरी, एक टेबलस्पून आलं - लसूण पेस्ट घालून परतवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला, व सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यात एक कप पाणी घाला. व  एक टेबलस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून धणे - जिरे पूड घालून मिक्स करा.

पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक कप बेसन घालून चमच्याने ढवळत राहा. ज्याप्रमाणे आपण पाटवडीसाठी बेसनचे मिश्रण तयार करतो, त्याचप्रमाणे हे पीठ घट्ट तयार करायचे आहे.

पावसाळ्यात कांदे - बटाटे लवकर सडतात, कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे बटाटे टिकतील भरपूर

आता दुसरीकडे एका ताटाला तेल लावून ग्रीस करा. व बेसनाचे तयार मिश्रण त्यात घालून थापून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर वडी कापून घ्या. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडी घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. आता फोडणीच्या पळीत तेल व पांढरे तीळ घाला, तीळ तडतड्ल्यानंतर वडीवर गार्निश करून डिश सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स