Join us  

कोणतंच खत न टाकताही बाग नेहमीच राहील हिरवीगार- १ सोपा उपाय, फुलंही भरपूर येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2024 2:25 PM

1 Simple Trick To Get More Flower From Terrace Garden: बाग नेहमीच सदाबहार राहावी, फुलझाडांना नेहमीच भरपूर फुलं यावी, म्हणून हा १ सोपा उपाय करून पाहा.

ठळक मुद्देआता आपण असा एक उपाय पाहणार आहोत, जो आपण दररोज केला तर झाडांना इतर कोणतंही खत घालण्याची गरज पडणार नाही.

आपल्याकडची जागा लहान असो किंवा मोठी असो, ज्यांना खरोखरच बागेची, गार्डनिंगची आवड आहे, ते लोक छोट्याशा जागेतही भरपूर रोपं लावून आपली बाग सुंदर सजवतात. बागेतली रोपं नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी झाडांची थोडी काळजी नक्कीच घ्यावी लागते. कारण नुसतं नित्यनेमाने पाणी घालून झाडांची म्हणावी तशी वाढ होत नाही. आपल्याला जशी वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची गरज असते, तशीच झाडांनाही असतेच. यासाठी मग बरेच लोक रोपांना वेगवेगळी खतं घालतात. आता आपण असा एक उपाय पाहणार आहोत (1 Simple remedy for terrace garden), जो आपण दररोज केला तर झाडांना इतर कोणतंही खत घालण्याची गरज पडणार नाही.(your garden will always bloom with bud and flower)

 

बाग नेहमीच हिरवीगार- फुललेली राहण्यासाठी उपाय

बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी तसेच बागेतल्या फुलझाडांना भरपूर फुलं येण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येईल, तो आता आपण पाहूया..

सोनम कपूरने बाळंतपणानंतर घटवलं तब्बल २० किलो वजन, बघा वेटलॉससाठी तिने नेमकं काय केलं...

हा उपाय करायला अतिशय सोपा आहे शिवाय तो करण्यासाठी आपल्याला खूप काही वेगळी मेहनत करण्याची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी एक छोटी बादली आणि मोठी गाळणी किंवा चाळणी मात्र वेगळी आणून ठेवून द्या.

 

आपण स्वयंपाक घरात दररोज भाज्या चिरतो- निवडतो, फळं कापतो.. निवडलेल्या भाज्यांच्या काड्या, फळांच्या साली- टरफलं असं सगळं एका बादलीत जमा करा. त्या बादलीमध्ये पाणी टाका.

घरात कोणतीच भाजी नसेल तर खमंग बेसन पराठे करा- नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठीही परफेक्ट मेन्यू

सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर घरात फळांचा किंवा भाज्यांचा जो काही कचरा तयार होईल, तो त्या बादलीत जमा करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून घेऊन ते पाणी झाडांना द्यायचं. 

 

दररोज जर हे पाणी थोडं थोडं का असेना पण झाडांना मिळालं तर ते त्यांच्या वाढीसाठी खूप पोषक ठरतं.

काळवंडलेला चेहरा होईल उजळ- चमकदार, फक्त ४ स्टेप्समध्ये करा दही फेशियल, मिळेल इंस्टंट ग्लो

कारण भाज्यांच्या सालींमध्ये, काड्यांमध्ये असणारे अनेक पोषणमुल्ये झाडांना मिळतात आणि त्यांची चांगली वाढ होण्यास तसेच भरपूर फुलं येण्यास मदत होते.  

टॅग्स :बागकाम टिप्सफळेइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बाग