आपल्या बाल्कनीची शोभा झाडांमुळे वाढते (Hibiscus Plant). काहींना गार्डनिंग करायला खूप आवडतं. बाल्कनीमध्ये तुळस हमखास असतेच. याव्यतिरिक्त गुलाब आणि जास्वंदाचं रोपही लावण्यात येते (Gardening tips). अनेकदा झाडांची वाढ होते, पण फुल आणि फळांची होत नाही. बऱ्याचदा हिरव्यागार पानांनी झाड बहरते. पण फुलांची वाढ होत नाही.
झाडांसाठी खत गरजेचं आहे. पण जर योग्य पद्धतीने खताचा वापर. आणि झाडांची काळजी घेतली नाही तर, झाड फक्त हिरव्या पानांनी बहरते. अनेकदा आपण फक्त रोपांना उन्हात ठेवलं आणि दिवसातून दोन वेळा पाणी दिलं की, रोपं वाढतात, असे समजतो. पण झाडांना खताचीही गरज असते. पण महागड्याच खताचा वापर करावा असंही नाही. जर आपल्याला महागड्या खताचा वापर न करता, झाडांची काळजी घ्यायची असेल तर, रॉक फॉस्फेटचा वापर करा. महागड्या खताचा वापर न करता, झाडावर फुलांची वाढ होईल(10 SECRETS TO INCREASE FLOWERING IN HIBISCUS PLANTS).
जास्वंदाच्या कुंडीत घाला घरगुती खत
- जास्वंदाच्या रोपाची योग्य पद्धतीने वाढ व्हावी असे वाटत असेल तर, रॉक फॉस्फेटचा वापर करा. रॉक फॉस्फेट हे पाण्यात विरघळणारे पदार्थ आहे. याचा वापर कुंडीतल्या मातीत केल्यास फुलांची योग्य वाढ होते. यातील नायट्रोजन आणि पोटॅशियम झाडाच्या योग्य वाढीस मदत करते.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
- यासाठी एक लिटर पाणी घ्या. त्यात रॉक फॉस्फेट घालून मिक्स करा. तयार पाणी कुंडीतल्या मातीत घाला. आपण या पाण्याचा वापर महिन्यातून एकदाच करू शकता. रॉक फॉस्फेटच्या पौष्टीक घटकांमुळे झाडांवर नवी फुलं येतात.
- जास्वंदाच्या झाडावर आपण चहा पावडरचाही वापर करू शकता. यासाठी आपल्याला वापरलेली चहा पावडर लागेल. जर चहा पावडर तुम्ही धुऊन, ती स्वच्छ सुकवून याचा खत म्हणून वापर केला, तर झाड फुलांनी बहरून जाईल.
- कारण यात पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस यांसारखे घटक अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे झाड पान आणि फुलांनी बहरते.
ना डाएट - ना व्यायाम; फक्त दिवभारात 'एवढे' लिटर पाणी प्या; बघा वजनातला फरक झ्टपट
- जर आपल्याला रॉक फॉस्फेटचा वापर करायचा नसेल तर, कांद्याच्या सालींचा वापर करा. कारण कांद्याच्या सालीमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर यांसारखे घटक जास्त प्रमाणामध्ये असतात. कांद्याच्या सालींचा वापर केल्याने झाड बहरते.
- यासाठी कांद्याच्या सालींचे पाणी तयार करा. कांद्याच्या सालींचा वापर केल्याने झाड बहरते. नंतर त्यात २-३ मग पाणी मिसळा. लिक्विड खत मातीत वापरण्याआधी माती थोडी कोरडी असणे आवश्यक आहे. नंतर कुंडीतल्या मातीत पाणी घाला.