Join us  

रोप वाढते पण गुलाबाची फुलंच येत नाही? कांदा - लसणाचा ' असा ' करा वापर; फुले येतील भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 4:25 PM

2 Mistakes Responsible For Roses Not Blooming : केमिकल खतावर पैसे खर्च करण्यापेक्षा घरगुती खत तयार करा

घरात एक गुलाबाचं रोप असेल तर, बाल्कनी आणि घराचीही शोभा वाढते (Gardening Tips). गुलाब कोणाला नाही आवडत. लाल, पिवळा, गुलाबी रंगाचे गुलाब फार आकर्षक वाटतात (Roses). बाल्कनीची खरी शोभा गुलाबाच्या टवटवीत सुंदर गुलाबाच्या फुलांनी वाढते. गुलाबाचे झाड आपण विकत आणतो आणि घरातल्या कुंडीत लावतो.

पण अनेकदा घरातल्या कुंडीत झाड तर वाढते पण फुलं येत नाही. नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे किंवा केमिकल रसायनयुक्त खतामुळे झाडाला गुलाबाचे फुल येत नसतील. अशावेळी बाजारातून खत विकत आणण्यापेक्षा घरगुती खत तयार करू शकता. या घरगुती खतामुळे गुलाबाचे रोप नक्कीच सुंदररित्या फुलेल(2 Mistakes Responsible For Roses Not Blooming).

गुलाबाच्या रोपासाठी घरगुती खत

कोरफड आणि कांदा रोपासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोरफड आणि कांद्यातील गुणधर्म गुलाबाच्या फुलांच्या वाढीसाठी मदत करतात. कांदा, लसूण आणि कोरफड मिसळून घरगुती खत तयार करू शकता. या नैसर्गिक खतामुळे झाडाला भरपूर गुलाबाचे फुलं येतील.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

अशा प्रकारे तयार करा गुलाबाच्या रोपासाठी घरगुती खत

- घरगुती खत तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोरफड, ४- ५ लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नका. पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक लिटर पाणी घाला. अशा प्रकारे घरगुती नैसर्गिक खत तयार.

साडीवर फॅशनेबल ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ९ स्टायलिश डिझाइन्स- साडी नेसून दिसाल ग्लॅमरस

झाडांना खत घालण्याची योग्य पद्धत

- गुलाबाच्या रोपाला खत घालण्यापूर्वी माती थोडी वेगळी करा. तयार खत मातीत मिसळा. आणि गुलाबाच्या मुळांवर घाला. आपण हे पाणी महिन्यातून एकदा गुलाबाच्या कुंडीत घालू शकता. यामुळे झाडांना सुरेख गुलाबाचे फुलं येतील. यासह झाडांना कीड लागणार नाही. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल