आपली बाग छोट्याशा बाल्कनीतली असो किंवा मग मोठ्या अंगणातली असो.. आपण बागेत जमतील तेवढी फुलझाडं नक्कीच लावतो. कारण झाडांचा हिरवागार रंग पाहून मन प्रसन्न होत असलं तरी आपल्या बागेत उमललेली ताजी- टवटवीत फुलं पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण कधी कधी फुलझाडांना फुलंच आली नाहीत किंवा खूपच कमी आली, तर मात्र हिरमोड होतो (gardening tips for blooming). म्हणूनच अशावेळी हे काही उपाय पाहून घ्या. हे उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर तुमची बाग नेहमीच वेगवेगळ्या फुलांनी बहरलेली राहील. (3 best gardening tips using baking soda for getting maximum flowers)
रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
वेगवेगळ्या फुलझाडांना भरपूर फुलं येण्यासाठी काय उपाय करावा, याची माहिती worlds.plant या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बेकिंग सोडा वापरून ३ वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने झाडांना भरपूर फुलं तर येतीलच पण झाडांवर काही रोग पडला असेल तर तो निघून जाईल आणि रोपांची चांगली जोमात वाढ होईल.
भाजी, वरण करताना त्यात कोथिंबीर कधी घालावी? बघा खास टिप्स- वाचा कोथिंबीर खाण्याचे फायदे
१. पहिला उपाय
पहिला उपाय करण्यासाठी १५ ग्रॅम बेकिंग सोडा १ लीटर पाण्यात मिसळा. हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि ते आठवड्यातून दोन वेळा झाडांवर शिंपडा. यामुळे झाडांना चांगली फुलं येतील. शिवाय पानंही हिरवीगार आणि टवटवीत दिसतील.
२. दुसरा उपाय
यासाठी अर्धा लीटर पाणी घ्या. त्या पाण्यात २५ ग्रॅम बेकिंग सोडा आणि व्हाईट व्हिनेगरचे काही थेंब टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हे पाणी झाडांना थोडं थोडं करून टाका. यामुळे मातीची पीएच लेव्हल चांगली राहाते आणि त्यामुळे रोपांची चांगली वाढ होते.
बागेतलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्याच्या ३ टिप्स, ग्रास राहील मेंटेन- बाग दिसेल स्वच्छ सुंदर
३. तिसरा उपाय
हा उपाय करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि साखर वापरणार आहोत. हा उपाय करण्यासाठी १ लीटर पाण्यात ३५ ग्रॅम बेकिंग सोडा आणि ५ ग्रॅम साखर टाका. हे मिश्रण आता झाडांवर फवार. यामुळे झाडांवर कोणता रोग पडला असेल तर तो निघून जाईल.