मार्च महिना उलटून आता एप्रिलला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सगळीकडेच तापमान वाढायला लागले आहे. पुढचे दोन महिने तर प्रखर ऊन असणार.. त्यामुळे आपण एसी लावणे, कुलर दुरुस्त करून घेणे, माठाची खरेदी करणे अशी स्वत:चा उन्हाळा सुसह्य होण्यासाठीची तयारी जशी सुरू केली आहे तशीच तयारी आपल्याला आपल्या बागेचीही करावी लागणार आहे. कारण रोपांची उन्हाळ्यात व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ती पुर्णपणे सुकून जातात (3 tips to take care of plants in summer). आपल्या छोट्याशा बागेची किंवा बाल्कनीतल्या कुंड्यांची अशी अवस्था होऊ द्यायची नसेल तर रोपांची थोडी काळजी घ्या.. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(Gardening Tips For Summer)
बागेतली रोपं उन्हामुळे सुकू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
१. रोपांची जागा बदला
आपल्याकडची रोपं नेहमीच छान हिरवीगार आणि टवटवीत राहावी यासाठी प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला कुंड्यांच्या जागेमध्ये थोडा बदल करावाच लागतो.
सुटलेलं पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम- व्हाल एकदम फिट
आता ज्या रोपांना खूप उन्हाची गरज नसते त्या रोपांना थोडं सावलीत हलवा. जी रोपं सावलीत राहणारी आहेत त्यांना उन्हाळ्याचे दोन महिने घरात कुठेतरी सजवून ठेवले तरी चालेल. अशा पद्धतीने रोपांची जागा बदलल्यास त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही.
२. हिरवा कपडा लावा
जास्वंद, गुलाब या रोपांना ऊन आवश्यक असते. पण उन्हाळ्यात उन्हाचा कडाका जरा जास्तच वाढलेला असतो, त्यामुळे त्यांना तो सहन होत नाही. त्यामुळे या रोपांवर तुम्ही बाजारात मिळणारा हिरवा कपडा आडोसा म्हणून लावा. यामुळे उन्हापासून या रोपांचं संरक्षण होण्यास नक्कीच मदत होईल.
३. पाणी घाला
उन्हाळ्यात राेपं हिरवीगार ठेवायची असतील तर त्यांना पाणी घालण्यासाठी मुळीच आळस करू नका.
Summer Special: जेवणाची रंगत वाढविणारे कैरीचे चवदार पदार्थ- यापैकी कोणते तुमच्या आवडीचे?
हिवाळा, पावसाळा या काळात अगदी दोन- दोन दिवस रोपांना पाणी घातलं नाही तरी चालतं. पण उन्हाळ्यात मात्र अगदी रोजच्या रोज पाणी घाला. नाहीतर रोपं लगेच सुकून जातात. सकाळी पाणी घालण्यापेक्षा रात्री पाणी घाला. यामुळे पाणी मातीमध्ये जास्त वेळ टिकून राहील.