Join us  

नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 1:07 PM

3 Important Tips For The Fast Growth Of New Plant: आपली बाग हिरवीगार करण्यासाठी आता मस्त दिवस आहेत... त्यामुळेच नर्सरीतून आणलेलं रोप कशा पद्धतीने आपल्या बागेत लावायचं ते पाहा.

ठळक मुद्देनर्सरीमध्ये हिरवंगार, टवटवीत दिसणारं रोप घरी आणल्यावर का सुकून जातं ते पाहा...

पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस म्हणजे गार्डनिंगसाठी अगदी सर्वोत्तम वेळ. या दिवसांत तुम्ही तुमची बाग छान हिरवीगार फुलवू शकतात. या दिवसांत रोपांची वाढही अगदी झपाट्याने होते. त्यामुळेच तर बरेच हौशी बागप्रेमी पावसाच्या २- ४ सरी झाल्या की उत्साहात शहरातल्या नर्सरीमध्ये जातात आणि तिथून त्यांच्या आवडीची वेगवेगळी रोपे घेऊन येतात. पण बऱ्याचदा असं होतं की नर्सरीमध्ये असेपर्यंत ती रोपं छान हिरवीगार असतात. आपण त्यांना कुंडीमध्ये लावल्यानंतर ती काही दिवस चांगली राहतात. पण नंतर मात्र सुकायला लागतात. असं सुकलेलं रोप पाहिलं की मग बागकामाचा सगळा उत्साहच जातो (important tips for the fast growth of new plant). म्हणूनच नर्सरीमध्ये हिरवंगार, टवटवीत दिसणारं रोप घरी आणल्यावर का सुकून जातं ते पाहा... (3 important gardening tips for beginners for plantation)

 

नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत कसं लावावं?

१. रोप लावण्याची लगेच घाई करू नका

नर्सरीतून आणलेलं रोप आपल्या घरच्या कुंडीमध्ये लगेच लावण्याची मुळीच घाई करू नका. घरी आणल्यानंतर ते रोप एखादा दिवस तसंच राहू द्या. त्यानंतर ते घरच्या कुंडीमध्ये हलवा.

रात्री लवकर झोप लागत नाही? १ मिनिटाचा सोपा उपाय- अंथरुणावर पडताच चटकन शांत झोपाल

कुंडीमध्ये राेप लावताना ते उपटून लावू नका. त्याच्यासोबत जी माती आली आहे, त्यासकट ते कुंडीमध्ये हलवा. असं करताना कुंडीत आधीपासूनच काही माती असेल तर ती आधी काढून टाका. 

 

२. रोपानुसार कुंडी निवडा

काही रोपं उंच वाढणारी असतात. काही पसरट वाढणारी असतात. काहींची खूप वाढ होते तर काही छोट्या जागेतच खूप फुलतात.

एसीची गारेगार हवा ठरू शकते धोकादायक- तज्ज्ञ सांगतात कायम एसीमध्ये बसण्याचे ४ दुष्परिणाम

तुमचं रोप नेमकं कशा पद्धतीचं आहे ते पाहा आणि त्यानुसार अचूक कुंडीची निवड करा. तुम्ही रोपाच्या वाढीच्या क्षमतेपेक्षा कमी खोल असणारी लहान कुंडी निवडली तरी रोप काही दिवसांत सुकू शकतं.

 

३. रोप नेमकं कसं आहे ते समजून घ्या

काही रोपांना जास्त पाणी लागतं, काही रोपांना कमी पाणी लागतं. काही रोपं उन्हात जास्त वाढतात तर काही सावलीत.

वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

तुम्ही आणलेलं रोप नेमकं कशा प्रकारचं आहे हे त्या नर्सरीतल्या जाणकार व्यक्तीकडून तुमच्या रोपाची व्यवस्थित माहिती करून घ्या. प्रत्येक रोपाला लागणाऱ्या मातीतही फरक असतो. तशी सगळी माहिती घेऊनच रोपाची काळजी घ्या. बघा तुमचं रोप काहीच दिवसांत कसं टरारून वाढेल.  

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्समोसमी पाऊस