Lokmat Sakhi >Gardening > बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन...

बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन...

3 Indoor plants good for bedroom : या रोपांना जास्त मेंटेनन्स लागत नसल्याने ती सांभाळणेही सोपे असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 12:27 PM2024-01-14T12:27:25+5:302024-01-14T12:28:59+5:30

3 Indoor plants good for bedroom : या रोपांना जास्त मेंटेनन्स लागत नसल्याने ती सांभाळणेही सोपे असते.

3 Indoor plants good for bedroom : Put 3 green indoor plants in the bed, feel fresh forever - get plenty of oxygen... | बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन...

बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन...

इनडोअर प्लांटस ही सध्या घर सजवण्याची नवी पद्धत झालेली आहे. घरात शो पिस कींवा आणखी काही ठेवण्यापेक्षा प्रत्येक रुममध्ये त्या रुमला साजेल असे डिझायनर पॉट ठेवणे आणि त्यामध्ये मस्त रंगबिरंगी रोपं लावणे याला अनेक जण प्राधान्य देताना दिसतात. यामुळे घरात प्रसन्न आणि फ्रेश तर वाटतेच पण ऑक्सिजनची पातळीही चांगली राहण्यास मदत होते. तसेच या रोपांना जास्त मेंटेनन्स लागत नसल्याने ती सांभाळणेही सोपे असते. होम गार्डनमध्ये आपण साधारणपणे तुळस, जास्वंद, मोगरा, गुलाब, सदाफुली अशी वाढणारी आणि भरपूर हवा, उजेड लागणारी रोपं लावतो. पण इनडोअर प्लांटसना जास्त हवा-उजेड नाही मिळाला तरी चालतो. त्यामुळेच ती घराच्या आतही छान ताजीतवानी राहतात. बेडरुममध्ये काही रोपं आवर्जून लावायला हवीत, ती कोणती पाहूया (3 Indoor plants good for bedroom)...

१. स्नेक प्लांट 

हे रोप नैसर्गिक एअर प्युरीफायरप्रमाणे काम करते. रात्रीच्या वेळी या रोपातून जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होत असल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. हवेतील हानिकारक रसायनांचे शुद्धीकरण होण्यासाठीही स्नेक प्लांट उपयुक्त ठरते. दारं खिडक्या बंद असतील आणि रुममध्ये एसी लावला असेल तर २ व्यक्तींमुळेही रुममध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईडची निर्मिती होते. पण खोलीत हे रोप असेल तर ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. मनी प्लांट 

घरात असायलाच हवे असे हे मनी प्लांट घराची शोभा वाढवण्यासही मदत करते. याची वेगळ्या आकाराची पाने भरभर वाढत असल्याने घराच्या कोपऱ्यात हे रोप लावायला हवे. घरातलं वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहावं यासाठी हा प्लांट अतिशय फायदेशीर असतो. या रोपावर धूळ बसल्याने रोप त्याचे काम योग्य पद्धतीने करु शकत नाही. अशावेळी सुती कापडाने रोपाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत.

(Image : Google)
(Image : Google)

३. अरेका पाल्म

अरेका पाल्ममुळे हवेतील फार्मेल्डीहाइड, कार्बन डाय ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड यांसारखे विषारी वायू नष्ट होतात आणि हवा शुद्ध होण्यास मदत होते.  या रोपामुळे नकळत बेडरुममध्ये फ्रेश वाटण्यास मदत होत असल्याने बेडरुममध्ये इनडोअर प्लांट लावण्याचा विचार करत असाल तर हे रोप आवर्जून लावावे. 
 
 

Web Title: 3 Indoor plants good for bedroom : Put 3 green indoor plants in the bed, feel fresh forever - get plenty of oxygen...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.