Join us  

घरातली धूळ- दुर्गंधी कमी करणारी ३ रोपं, घरात पाऊल ठेवताच वाटेल प्रसन्न आणि पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 9:14 AM

Plants That Helps To Reduce Dust In House: घरातली धूळ कमी करणारी ३ रोपं कोणती ते आता पाहूया..

ठळक मुद्देआपल्या आजुबाजुची हवा शुद्ध ठेवणारी जशी काही झाडं असतात, तशीच काही झाडं त्यांच्या आसपासची धूळही शोषून घेतात

घराच्या आसपास मोजकीच का असेना पण काही रोपं मात्र नक्की असावीत. कारण त्यांच्यामुळे आपल्या घराच्या आजुबाजुचा परिसर कसा प्रसन्न आणि जिवंत वाटू लागतो. म्हणूनच तर हल्ली घरात देखील अनेक जण इनडोअर प्लांट्स आणून ठेवतात. इनडोअर प्लांट्समुळे घराचा लूक तर एकदम बदलून जातो. घरात सकारात्मक, फ्रेश वाटू लागतं (3 Plants that helps to reduce dust in house). आपल्या आजुबाजुची हवा शुद्ध ठेवणारी जशी काही झाडं असतात, तशीच काही झाडं त्यांच्या आसपासची धूळही शोषून घेतात (Plants that helps to absorb toxic gases from house). अशी रोपं नेमकी कोणती ते आता पाहूया...

घरातली धूळ कमी करणारी ३ रोपं

 

आपल्या घरात असणारी धूळ शोषून घेऊन घर स्वच्छ, सकारात्मक ठेवण्यासाठी मदत करणारी रोपं कोणती याविषयीचा व्हिडिओ rootgrowings या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

१. पाम

यामध्ये सगळ्यात पहिलं रोप आहे पाम Pygmy Date Palm.

साडीच्या पदराचा वरचा काठ नीट बसतच नाही? १ सोपी ट्रिक- काठ उठून दिसतील, पदर चापून चोपून बसेल

एखाद्या मोठ्या आकाराच्या कुंडीत तुम्ही पाम लावू शकता. पामला भरपूर सुर्यप्रकाश लागतो. या झाडांमध्ये असलेले काही पार्टिकल्स हवेतली धूळ तर शोषून घेतातच पण त्यासोबतच कार्बन मोनोक्साईडसारखे विषारी वायूही शोषून घेतात.

 

२. रबर प्लान्ट

हे झाड एखाद्या मोठ्या कुंडीत लावावं. यालाही भरपूर सुर्यप्रकाश आणि कमी पाणी लागतं.

मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

या झाडाची पानं तेलकट असतात. हे झाडंही घरातली धूळ शोषून घेतं तसेच बेन्झीन, झायलीन यांच्यासारखे विषारी वायू शोषून घेण्यासाठीही मदत करते.

 

३. स्पायडर प्लान्ट

अगदी कमीतकमी मेंटेनन्स लागणारं हे रोप असून ते लहानशा कुंडीतही छान फुलून येतं. हवेतली धूळ तर ते शोषून घेतच पण त्यासोबतच कार्बन मोनोक्साईड आणि इतर दुषित वायू कमी करण्यासही मदत करतं. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्ससुंदर गृहनियोजन