Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं

कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं

Gardening Tips: पावसाळा असूनही झाडांची चांगली वाढ होत नसेल, फुलं येत नसतील तर हे काही घरगुती उपाय करून बघा... फुलांनी बहरून येईल तुमची बाग. (3 ingredients of our kitchen that helps plants to blossom)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 06:46 PM2023-09-11T18:46:38+5:302023-09-11T18:48:20+5:30

Gardening Tips: पावसाळा असूनही झाडांची चांगली वाढ होत नसेल, फुलं येत नसतील तर हे काही घरगुती उपाय करून बघा... फुलांनी बहरून येईल तुमची बाग. (3 ingredients of our kitchen that helps plants to blossom)

3 Things that helps for plan's growth, 3 ingredients of our kitchen that helps plants to blossom | कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं

कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं

Highlightsपावसाळा सुरू असूनही झाडांची म्हणावी तशी वाढ होत नाहीये. झाडांवर भरपूर फुलं दिसत नाहीयेत. असं तुमच्याही बागेत होत असेल तर कुंडीतल्या मातीत हे काही पदार्थ मिसळा

खरंतर पावसाळ्यात झाडांची जोमाने वाढ होत असते. एरवी वर्षभर भरपूर पाणी देऊनही झाडं जेवढी टवटवीत होत नाहीत, तेवढी हिरवीगार, प्रफुल्लित झालेली ती पावसाळ्यात दिसतात. पण बऱ्याच जणांना असाही अनुभव येतो की ऐन पावसाळा सुरू असूनही झाडांची म्हणावी तशी वाढ होत नाहीये. झाडांवर भरपूर फुलं दिसत नाहीयेत. असं तुमच्याही बागेत होत असेल तर कुंडीतल्या मातीत हे काही पदार्थ मिसळा (3 Things that helps for plan's growth). यामुळे झाडांची वाढ जोमाने होईल शिवाय भरपूर फुलं येऊन तुमची बाग अगदी फळाफुलांनी बहरून जाईल. (3 ingredients of our kitchen that helps plants to blossom)

 

झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारे ३ पदार्थ
१. चहा पावडर

चहाचं पाणी किंवा चहा पावडर झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरी चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर वापरली तरी चालेल.

 

धार बोथट झाली म्हणून कात्री फेकून देता? ३ उपाय, कात्रीला लावा चटकन तेज धार - ते ही फुकट

१ चमचा चहा पावडर असेल तर ती १ ग्लास पाण्यात टाका. आणि ते पाणी कुंडीतल्या मातीत टाका. 

 

२. ताक 
ताकही झाडांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतं. १ ग्लास ताक असेल तर त्यात ३ ग्लास पाणी टाका.

दिवाणच्या बॉक्समध्ये भरुन ठेवलेल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय, न धुताच कपड्यांना येईल सुगंध

हे मिश्रण कुंडीतल्या मातीत टाका. झाडांना नियमितपणे ताक घातले तर झाडांची वाढ खूप चांगली होते.

 

३. कांद्याचं पाणी
स्वयंपाक करताना आपण रोज कांदा वापरतोच. कांदा चिरल्यानंतर त्याची टरफलं एका भांड्यात जमा करा.

गौरी- गणपतीच्या डेकोरेशनसाठी ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या आकर्षक बॅकड्रॉप, बघा ३ सुंदर पर्याय 

त्यात पाणी टाका. हे पाणी ८ ते १० तास तसेच राहू द्या. त्यानंतर ते पाणी झाडांना द्या. यामुळे झाडांची वाढ तर चांगली होईलच, पण झाडांना फुलं येण्याचं प्रमाणही खूप वाढेल. 
 

Web Title: 3 Things that helps for plan's growth, 3 ingredients of our kitchen that helps plants to blossom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.