अनेकांना घरात बागकाम करायला आवडते. ज्यामुळे काही लोकं छोट्याशा बाल्कनीमध्ये मोगरा, गुलाब, जास्वंदाची रोपटे लावतात. पण बऱ्याचदा घरात लावलेल्या रोपाला फुलं येत नाही. फुलांचे रोप (Rose Plant) खरेदी करताना ती चांगली असतात. पण नंतर फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. गुलाबाची फुलं बाल्कनीची शोभा वाढवण्याचं काम करतात .
पण गुलाबाच्या रोपाला गुलाबाची फुलं आलीच नाही तर? वाईट वाटतं ना? गुलाबाच्या रोपाला गुलाब न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Gardening Tips). पण गुलाबाच्या रोपट्याला चांगली फुलं बहरावी असे वाटत असेल तर, मातीत ३ गोष्टी मिसळा. यामुळे झाड गुलाबाच्या फुलांनी बहरेल(3 Tips To Make Your Roses Bloom More).
गुलाबाचे झाड वाढवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी
- गुलाबाचे रोपटे फुलांनी बहारावे, यासाठी त्याच्या पोषणाची विशेष काळजी घ्यायला हवी. झाडाला पुरेसे खत आणि त्यातून पुरेसे पोषण नाही मिळाले, की फुलांची योग्य वाढ होत नाही. मातीत खत मिसळल्याने गुलाबाच्या रोपट्याची सुंदर वाढ होते.
- स्प्राउट वेबसाइटनुसार, गुलाबाच्या रोपांच्या उत्तम वाढीसाठी तीन प्रमुख मॅक्रोन्यूट्रिएंट्सची आवश्यकता आहे. पहिले नायट्रोजन, यामुळे रोपट्याला पोषण मिळते.
- दुसरी गोष्ट फॉस्फरस आहे. यामुळे रोपट्याच्या मुळांना मजबुती मिळते. झाडाची मुळं मजबूत झाल्यानंतर रोपटे देखील बहरते.
तणावापासून ठेवतील 'कोसों दूर', फक्त तुळशीसोबत 'ही' ४ प्रकारची झाडं लावायला विसरू नका
- आणि तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे, पोटॅशियम. जे फुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.
- या तीन मॅक्रोन्युट्रिएंट्स व्यतिरिक्त, गुलाबाच्या झाडांना लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियमयुक्त खताची आवश्यकता असते.
- झाडांना नियमित पाणी दिल्याने सर्व पोषण पाण्याने धुऊन जाते, ज्यामुळे मातीची पीएच पातळी काही दिवसानंतर खराब होऊ लागते. त्यामुळे दर काही महिन्यांनी मातीची गुणवत्ता तपासत राहा आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर करत राहा.
- शिवाय मातीत रेती किंवा दगड असेल तर ग्रोथ थांबते. यासह गुलाबाची रोपं छाटू नका हे फुलं न येण्याचे कारण ठरू शकते.
लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा फुकट मिळणाऱ्या २ गोष्ट; पिवळ्या धमक लिंबूने बहरेल रोपटं
- फुलांची झाडं अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी जास्त ऊन येत असेल. उन्हामुळे रोपट्याच्या वाढीसाठी मदत होईल.
- स्वयंपाकघरातील उरलेलं भाज्यांचे पाणी, फळांची सालं यासह इतर खाद्यपदार्थ आपण मातीत मिसळू शकता. या साहित्य नैसर्गिक खत म्हणून काम करते.