Lokmat Sakhi >Gardening > दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक

दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक

4 Indoor Plnats for home decoration in Diwali : घरात रोपं लावायची हे जरी खरं असलं तरी ती रोपे कोणती असायला हवीत आणि त्याचे फायदे याविषयी माहिती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 01:23 PM2023-11-01T13:23:52+5:302023-11-02T12:18:19+5:30

4 Indoor Plnats for home decoration in Diwali : घरात रोपं लावायची हे जरी खरं असलं तरी ती रोपे कोणती असायला हवीत आणि त्याचे फायदे याविषयी माहिती हवी

4 indoor plants to decorate the house with green plants on Diwali, see how the look of the house will change | दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक

दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक

दिवाळीच्या दिवसांत अनेकदा आपण घराला रंग देतो, घरातले पडदे, काही वस्तू बदलतो आणि घराचा लूक चेंज करण्याचा प्रयत्न करतो. घर तेच पण आपल्याला ते थोडं नवं वाटावं यासाठी आपण काही ना काही बदल आवर्जून करत असतो. बरेचदा फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स किंवा शो पिस, वेगळ्या आकाराचे दिवे ठेवून आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी जीवंत अशा रोपांनी आपण घर नक्कीच सजवू शकतो. गॅलरी सजवण्यासाठी आपण ज्याप्रमाणे लाईटच्या माळा, रंगबिरंगी फुलांची रोपं, काही वेल यांचा वापर करतो त्याचप्रमाणे घर सजवण्यासाठीही आपण काही इनडोअर प्लांटसचा आवर्जून वापर करु शकतो. सध्या बाजारात त्यासाठी बरेच पर्याय असून ही रोपं लावण्यासाठी चिनी मातीच्या, काचेच्या, प्लास्टीकच्या किंवा नेहमीच्या मातीच्या कुंड्यांमध्ये बरेच पर्यायही उपलब्ध असतात. आता घरात रोपं लावायची हे जरी खरं असलं तरी ती रोपे कोणती असायला हवीत आणि त्याचे फायदे याविषयी माहिती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाहूयात घरात लावता येतील अशी काही खास रोपं कोणती (4 Indoor Plnats for home decoration in Diwali)...

१. अरेका पाम- हवा शुध्द करण्यासाठी ही वनस्पती सर्वात जास्त उपयुक्त असल्याचे मानले जाते. अरेका पाम हवेतील फार्मेल्डिहाइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यासारखे विषारी गॅस घालवून शुध्द ऑक्सिजन पुरवते. त्यामुळे घरात किंवा घराच्या आजूबाजूला हे रोप लावले तर घरात येणारी हवा शुध्द होते. दिसायलाही छान दिसत असल्याने सजावटीसाठी याचा नक्की विचार करु शकतो. 

(Image : Google )
(Image : Google )

२. मनी प्लाण्ट- मनी प्लाण्ट सहसा घराघरात असतोच. हवा शुध्द करण्यास मनी प्लाण्टची मदत होते. मनी प्लाण्टमुळे घरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. तसेच या पानांचा आकार छान असल्याने आणि हे रोप थोडे पसरलेले असल्याने घराच्या सजावटीसाठी एखाद्या कोपऱ्यात किंवा बाटलीत लटकवलेल्या अवस्थेत आपण हे रोप नक्की ठेवू शकतो. 

(Image : Google )
(Image : Google )

३. डेझर्ट रोज - ही इनडोअर लावता येईल अशी गुलाबाची एक जात आहे. यासाठी खूप जास्त जागाही लागत नसून तो दिसायलाही अतिशय सुंदर दिसतो. घराच्या एखाद्या कोपऱ्यात, टेबलवर असे कुठेही हे रंगीत गुलाबाचे रोप ठेवता येते. याला सूर्यप्रकाश चांगल्या प्रमाणात लागत असल्याने शक्यतो घरात ज्याठिकाणी प्रकाश येतो अशा ठिकाणी हे रोप ठेवावे. यामध्येही बरेच प्रकार पाहायला मिळतात, आपल्या आवडीनुसार आपण निवड करु शकतो. 

(Image : Google )
(Image : Google )

४. चायनीज एव्हरग्रीन प्लांट - कमी प्रकाशात वाढणारी आणि पाणीही कमीत कमी लागणाऱ्या या वनस्पतीला जास्त मेंटेनन्स लागत नाही. या रोपामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. अगदी १०० रुपयांच्या किमतीमध्ये हे रोप खरेदी करता येऊ शकते. यातही बाजारात बरेच प्रकार पाहायला मिळतात.  

(Image : Google )
(Image : Google )

Web Title: 4 indoor plants to decorate the house with green plants on Diwali, see how the look of the house will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.