Lokmat Sakhi >Gardening > भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं

भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं

4 Most Common Gardening Mistakes In Monsoon: ऐन पावसाळ्यातही तुमची बाग म्हणावी तशी बहरली नसेल तर या काही चुका टाळा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 07:30 PM2024-08-20T19:30:28+5:302024-08-20T19:31:34+5:30

4 Most Common Gardening Mistakes In Monsoon: ऐन पावसाळ्यातही तुमची बाग म्हणावी तशी बहरली नसेल तर या काही चुका टाळा....

4 most common gardening mistakes in monsoon, how to take care of plants in monsoon? | भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं

भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं

Highlightsपावसाळ्यात आपण अनेक वेगवेगळी रोपं आणतो आणि आपल्या बागेत लावतो. काही रोपं आपल्याला माहितीही नसतात. पण तरी छान दिसतात म्हणून घेऊन येतो.

पावसाळा हा रोपांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम ऋतू... आपण कितीही पाणी रोपांना दिलं तरी पावसाच्या पाण्यातून त्यांना जे काही मिळतं त्याची सर कशातच नाही. म्हणूनच तर पावसाच्या पाण्याने रोपं अगदी हिरवीगार होऊन जातात. फुलझाडांना भरपूर फुलं येतात. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेल्या कुंड्या पाहून मन रिफ्रेश होऊन जातं. पण काही जणांची बाग मात्र अजिबात हिरवीगार होत नाही. उलट रोपांची पानं गळू लागतात, पिवळी पडतात (4 most common gardening mistakes in monsoon). काही रोपं तर बिचारी सडून जातात, नाहीतर मग राेपांवर बुरशी पडते. असं तुमच्याही बागेच्या बाबतीत झालं असेल तर तुमच्याकडूनही या काही चुका होत नाहीत ना, ते एकदा तपासून घ्या...(how to take care of plants in monsoon?)

या ४ चुकांमुळे बाग बहरत नाही

 

१. चुकीच्या रोपांची निवड

पावसाळ्यात आपण अनेक वेगवेगळी रोपं आणतो आणि आपल्या बागेत लावतो. काही रोपं आपल्याला माहितीही नसतात. पण तरी छान दिसतात म्हणून घेऊन येतो.

कंटाळा येतो, वेळ नाही म्हणून एकदाच कणिक भिजवून फ्रिजमध्ये ठेवता? शिळ्या पोळ्या बऱ्या की

पण त्या रोपांना चुकीच्या जागी ठेवलं किंवा त्यांना पाणी, खत, ऊन कसं लागतं याची माहिती घेतली नाही तर ती रोपं व्यवस्थित रुजत नाहीत आणि मग हळूहळू कोमेजून जातात. त्यामुळे कोणतंही रोप घेण्याआधी त्याची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानुसारच ते तुमच्या बागेत लावा.

 

२. कुंडीची निवड

काही रोपं अशी असतात की ती खूप वाढतात. त्यामुळे दरवर्षी ती मोठ्या कुंडीत हलवावी लागतात. पावसाळ्याच्या दिवसात रोपांची वाढ खूप जोमाने होते. त्यामुळे जर रोपाची वाढ जास्त आणि त्यामानाने कुंडी लहान आकाराची असेल तर हळूहळू राेप सुकू लागतं. 

रेस्टॉरंटसारखा कुरकुरीत मसाला डोसा घरी करायचा? ५ खास टिप्स- डोसा करण्यात व्हाल एक्सपर्ट

३. खूप जास्त खत

रोपांच्या चांगल्या वाढीसाठी खतं आवश्यक आहेतच. पण त्यांना जर गरजेपेक्षा जास्त खत दिलं तर ते त्यांना सहन होत नाही आणि ते सुकू लागतात. किंवा त्यांची पानं पिवळी पडून गळू लागतात. 

 

४. गरजेपेक्षा जास्त पाणी

काही  रोपं अशी असतात की त्यांना खूप कमी पाणी लागतं. अगदी माती ओलसर राहील एवढं पाणी मिळालं तरी ते खूप असतं.

मुलं अजिबात ऐकत नाहीत-हट्टीपणा करतात? एक्सपर्ट सांगतात १ उपाय- मुलं ऐकतील- गुणी होतील

अशा प्रकारची रोपं जर तुम्ही भर पावसात ठेवली तर अतिपाण्यामुळे ती खराब होतात. सडतात. अशावेळी त्यांची जागा बदलणं खूप गरजेचं असतं. 

 

Web Title: 4 most common gardening mistakes in monsoon, how to take care of plants in monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.