Join us  

तुमच्याही जास्वंदाची पानं पिवळी पडली? ४ महत्त्वाची कारणं, २ उपाय – जास्वंद राहील हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 9:50 AM

4 reasons behind hibiscus plant yellow leaves : असं होऊ नये म्हणून काय करायला हवं याविषयी..

जास्वंद हे आपल्या घरातल्या बागेत आवर्जून असणारं एक रोप. गणपतीला आवडणारी आणि केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर असलेली ही फुलं रोपाला आली की अतिशय सुंदर दिसतात. लाल, गुलाबी, पिवळा अशा एकाहून एक छान रंगात असलेलं जास्वंद कुंडीत दिसायलाही छान दिसतं. म्हणूनच आपण होम गार्डनमध्ये इतर रोपांसोबतच जास्वंदाचं रोप आवर्जून लावतो. इतर रोपांच्या तुलनेत जास्वंदाला किड लागण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं.इतकंच नाही तर हे रोप छान वाढतं, त्याला कळ्या- फुलंही भरपूर येतात. पण काही कारणाने या रोपाची पानं अचानक पिवळी पडायला लागतात. ही पानं पिवळी पडली की ती गळून पडतात आणि रोप उजाड दिसायला लागतं. आता जास्वंदाची पानं पिवळी पडण्यामागे नेमकी काय कारणं असतात आणि असं होऊ नये म्हणून काय करायला हवं ते समजून घेऊया (4 reasons behind hibiscus plant yellow leaves)... 

पानं पिवळी पडण्याची ४ महत्त्वाची कारणं... 

१. नवीन पानं तयार होतात तेव्हा जुनी पानं पिवळी पडण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

२. ऋतू हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये बदलत असताना रोपाला ऋतूबदलाचा ताण होत असल्यानेही पानं पिवळी पडण्याची शक्यता असते. 

३. रोपाला आवश्यकतेपेक्षा कमी पोषण मिळत असेल तरीही पानं पिवळी होण्याची शक्यता असते. 

४. याशिवाय रोपाला भरपूर कळ्या आणि फुलं येत असतील तर जास्तीचे पोषण त्यांना मिळते आणि पानांचे पोषण कमी होऊन ती पिवळी होतात.   

उपाय काय?

१. मातीमध्ये शेणखत घालणे हा यावर एक चांगला उपाय ठरु शकतो, यामुळे पाने पिवळी होण्यापासून वाचू शकतात.

२. त्याचप्रमाणे द्रव रुपातील खत दिल्यानेही रोपाला चांगले पोषण मिळू शकते आणि रोप हिरवेगार राहण्यास त्याची चांगली मदत होते. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स