अनेक घरांमध्ये आजही तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीला जितके धार्मिक महत्त्व आहे, तितकेच आरोग्यासाठी होणाऱ्या महत्त्वांसाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच घरांमध्ये तुळशीचे रोप असतेच (Basil Leaves). मात्र काही वेळा तुळशीचे झाड वाढत्या तापमानामुळे अथवा कीड लागल्यानेही सुकून जाते (Gardening Tips). अशावेळी लोकं कुंडीतले सुकलेले रोपटे काढून नवे रोपटे लावतात. पण नेमके रोप सुकते कशाने?(4 Reasons Why Your Tulsi Plant is Drying Out).
तुळस का सुकते?
मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी
- तुळस सुकण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जेव्हा रोपट्याला कीड लागते, तेव्हा रोपटे सुकते.
- रोपट्याला अधिक पाणी मिळाल्याने सुकते, अशावेळी तुळशीचे मूळ खराब होतात.
- तुळशीची कुंडी जर लहान असेल, आणि मुळांना वाढीसाठी पुरेशी जागा न मिळाल्यास त्याची वाढ योग्यरित्या होत नाही.
- हवामानात बदल घडल्याने तुळशीचे रोपटे सुकते.
काय करता येईल?
तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका
१. नवे रोपटे आणण्यापेक्षा आपण कुंडीतल्या मातीत कुठलंही खत घाला. मात्र अगदी थोडं चमचाभर पाण्यात मिसळून घाला.
२. रोपाची सुकलेली पानं छाटा.
३. गांडूळ खत, शेणखतही घालू शकता.